S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'दशक्रिया'च्या विरोधामागची कारणं...

'दशक्रिया' सिनेमा रिलीजवर एवढा आक्षेप का या प्रश्नाची काही तत्सम अशी उत्तरं आम्ही शोधलीयेत.

Sachin Salve | Updated On: Nov 17, 2017 10:40 PM IST

'दशक्रिया'च्या विरोधामागची कारणं...

चित्राली चोगले,मुंबई

17 नोव्हेंबर : दशक्रिया हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात रिलीज तर झालाय पण सिनेमावर एवढा आक्षेप का हा प्रश्न अनेकांना पडलाय. सिनेमातले असे कोणते मुद्दे खटकले असतील त्याचा हा आढावा...

'दशक्रिया' सिनेमा रिलीजवर एवढा आक्षेप का या प्रश्नाची काही तत्सम अशी उत्तरं आम्ही शोधलीयेत. या गोष्टींमुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे सीन्स कोणते तर...संपूर्ण सिनेमात ब्राम्हण समाजा अवतीभवती रेखाटला गेलाय. त्यातही किरवंत आणि लग्न मुंज करणारे ब्राम्हण यात विभाजन झालेलं दाखवलं गेलंय. शिवाय सिनेमात या दशक्रियेचा धंदा मांडल्याचा आरोपही या किरवंत ब्राम्हणांवर केला जातो.अगदी लग्नाकार्यसाठी सुद्धा हवे तेवढे दर सांगताताच की असंही म्हटलं गेलंय. अखेरीस या समाजावर घाला झाल्यास सगळे ब्राम्हण एकमेकांतील वाद विसरत गावाच्या विरोधात उभे रहातात आणि दशक्रिया विधी करण्यास नकार देतात. त्यामुळे सिनेमाचे खलनायक होऊन बसतात.

पण लक्षात घेणं गरजेचे आहे की, सिनेमात रखरखीत सत्य दाखवलं गेलंय ते एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी नसून ते सत्य दर्शवण्यासाठी आहे किंवा त्या गोष्टीतून उदरनिर्वाह करणारे गरीब कुटुंब ही दर्शविले गेली आहेत. त्यांचाही प्रश्न एका पद्धतीने मांडला जावा म्हणून...हा सिनेमा तब्बल २५ वर्षांपूर्वी आलेल्या बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित आहे. जी तेव्हा प्रचंड गाजली. कादंबरीवर त्या काळी टीका झाली नाही तर आज एवढ्या पुढारलेल्या काळात वावरत असताना सिनेमावर टीका वाद का असा प्रश्न नक्कीच मनात आल्याशिवाय रहात नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 09:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close