पावसाचा फटका मालिकांनाही! तरीही कलाकारांनी म्हटलं, शो मस्ट गो ऑन

पावसाचा फटका मालिकांनाही! तरीही कलाकारांनी म्हटलं, शो मस्ट गो ऑन

Rain, Shooting, Serials - मालिकांची शूटिंग्ज पावसामुळे थांबवावी लागली. तरीही रोजचे एपिसोड्स नियमित सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : महाराष्ट्रात पुराचा तडाखा बसलाय. पावसानं कहर केलाय. याचा परिणाम मालिकांच्या शूटिंगवर होतो. पण काही जण त्यासाठी  बऱ्याच मालिकांचं शूटिंग अगोदरच करून ठेवतात. रात्रीस खेळ चाले मालिकेचं शूटिंग कोकणात होतंय. कोकणातल्या पावसाचा अंदाज घेता, या मालिकेचं शूटिंग एक महिन्याचं शूटिंग अगोदर करून ठेवलं. कलाकारांना तर एक महिना शूटिंगला सुट्टी होती. त्यामुळे भर पावसात काही अडचण आली नाही. शिवाय आता कोकणात पाऊस पडत असला तरीही या मालिकेचं शूटिंग इनडोअर सुरू आहे.

आता रात्रीस खेळ चाले मालिकेतल्या कलाकारांपैकी काही जण कोल्हापूरचे. पाटणकर ही व्यक्तिरेखा साकारणारेही कोल्हापूरचेच. पण ते शूटिंगला कोकणात पोचले आणि पुन्हा परत जाण्यासाठी मात्र अडकले.

माझ्या नवऱ्याची बायको : अखेर राधिका सौमित्रला लग्नासाठी देते होकार पण...

कोल्हापुरात महापुराचा फटका तुझ्यात जीव रंगला मालिकेलाही बसला आहे. राणादा आणि पाठकबाई पुराच्या पाण्यात अडकले होते. आता ते सुरक्षित स्थळी आहे. ज्या ठिकाणी शूटिंग सुरू होते, तिथे पाणी साचल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं आहे. पण मालिकेचं दीड महिन्याचं शूटिंग आधीच करून ठेवलंय. त्यामुळे प्रेक्षकांना काही फरक पडणार नाही. त्यांचे एपिसोड्स नियमित सुरू राहणार आहेत.

VIDEO : मलायकाशी फ्लर्ट करणाऱ्या अभिनेत्यावर भडकला अर्जुन कपूर!

मुंबईतही जोरदार पाऊस झाला तेव्हा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचं शूटिंगही थांबवावं लागलं होतं. नवीन सुरू झालेली मालिका भागो मोहनचंही शूट थांबवलं होतं. पण आता ही शूटिंग सुरू झालीयत.

त्याचवेळी स्टार प्रवाहवरील विठुमाऊली मालिकेचं शूटिंगही एक दिवस बंद ठेवावं लागलं होतं. पावसाचा फटका मोलकरीण मालिकेलाही झाला होता. पण आता ही शूटिंग्ज सुरळीत सुरू झालीयत.

बऱ्याच मालिका आपले एपिसोड्स बँक करून ठेवतात. त्यामुळे शूटिंग थोडे दिवस बंद राहिलं तरी फार फरक पडत नाही. शो मस्ट गो ऑन म्हणत कलाकार कामाला लागतात.

नदीत पाणी नसल्याने लोकवस्तीत घुसणार होती मगर, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: serials
First Published: Aug 10, 2019 05:12 PM IST

ताज्या बातम्या