आमिरच्या चाहत्यानं दुबईहुन पाठवला तब्बल 54 किलोचा 'दंगल केक'

आमिरच्या चाहत्यानं दुबईहुन पाठवला तब्बल 54 किलोचा 'दंगल केक'

हा जगभरातील सर्वात महागडा आणि मोठा केक असल्याचंही बोलंल जातंय. हा केक तब्बल 54 किलोचा असून 200 लोक हा केक खाऊ शकतात.

  • Share this:

12 आॅगस्ट : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'दंगल' सिनेमाने सगळ्याचं प्रेक्षकांची मने जिंकली. जगभरात आमिरची फॅन फॉलोईंग इतकी आहे की त्याच्या दुबईच्या काही फॅन्सनी त्याच्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांचा 'दंगल केक' बनवलाय.

हा जगभरातील सर्वात महागडा आणि मोठा केक असल्याचंही बोलंल जातंय. हा केक तब्बल 54 किलोचा असून 200 लोक हा केक खाऊ शकतात.

या केकवर 'दंगल' सिनेमाचा एक सीन दाखवण्यात आलाय. तसंच केकवर तिरंगाही दाखवण्यात आलाय. तिरंग्याच्या दोन्ही बाजूला आॅलिम्पिकमधील सूवर्ण पदक आहेत. दंगलच्या हा केक बनवण्यास एक महिन्याचा अवधी लागला असून 1200 लोकांनी मिळून हा केक बनवलाय.

First published: August 12, 2017, 7:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading