दम मारो दम: बॉलिवूडमध्ये कोकेनची मागणी जास्त; ड्रग डीलरलचा NCB चौकशीत मोठा खुलासा
बॉलिवूडमध्ये कोकेन या ड्रगची मागणी जास्त आहे. अशी माहिती देऊन एका ड्रग डीलरने खळबळ उडवली आहे. बॉलिवूडमधील ड्रॅग कनेक्शन पुन्हा अधोरेखित झाल्यामुळे आता NCBचा तपास पुन्हा बीटाऊनभोवती सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई 26ऑक्टोबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग कनेक्शन (Drug Connection)चा अँगल समोर आला. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधल्या ड्रग कनेक्शनबाबत अनेक कलाकारांची नावं समोर येत आहेत. NCBने सध्या अनेक ड्रग पेडरलर्सची चौकशी करत आहे. या चौकशीमध्ये एक मोठा खुलासा समोर आला आहे. बॉलिवूडमध्ये कोकेन या ड्रगची मागणी जास्त असल्याची माहिती या ड्रग डीलरने दिली आहे. त्यात त्याने असंही सांगितलं आहे की, "सुशांत स्वत: कोकेन घ्यायचा"
सुत्रांच्या माहितीनुसार, अॅक्टर्स ड्रग डीलर्सकडून कोकेन मागवतात. सध्या दाऊद नाव्याच्या एका माफियाची NCBकडून चौकशी सुरू आहे. अटक केलेल्या ड्रग डीलरने दाऊद नावाच्या माफियाची माहिती दिली. दाऊद नायजेरिअन माणूस आहे. पण गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईतच वास्तव्याला आहे. दाऊदने एका भारतीय मुलीशी लग्नही केलं आहे. ड्रग्जच्या दुनियेत दाऊदचं नाव मोठं आहे. त्याच्याविरोधात सध्या एनसीबी पुरावे गोळा करत आहे. दरम्यान, NCBने अंधेरी परिसरातून एका ड्रग पेडलरला अटक केली आहे.
Maharashtra: Narcotics Control Bureau (NCB) arrested a drug peddler in Andheri area of Mumbai.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास आधी मुंबई पोलिसांकडे होता. त्यानंतर तो सीबीआयकडे सोपवण्यात आला. ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर या केसमध्ये एनसीबीची एन्ट्री झाली. एनसीबीने या आधीही अनेक ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. काहींचे फोनही जप्त केले आहेत. बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांचीही एनसीबीने चौकशी केली आहे. आता ड्रग डीलरने कोकेनसंदर्भात पुन्हा एकदा बॉलिवूडचं नाव घेतल्यामुळे बी टाऊनमधल्या काही कलाकारांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.