Home /News /entertainment /

BREAKING : सुटका नाहीच; आर्यन खानसह सर्व आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

BREAKING : सुटका नाहीच; आर्यन खानसह सर्व आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan's son Aryan Khan) याच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

    मुंबई, 7 ऑक्टोबर : सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan's son Aryan Khan) याच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासीन आर्यन खान NCB च्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान त्याला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील सतीश मानशिंदे यांनी आज कोर्टात न्यायाशीधांसमोर विविध प्रकारे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र आर्यन खान सह सर्व आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) अटक झाल्यानंतर मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात NCB ने ७ दिवस आपल्या कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. आर्यन खान याचे वकील मानशिंदे यांनी कोर्टात सांगितलं की, आरोपींना NCB च्या ताब्यात ठेवण्याची गरज नाही. दरम्यान उद्या ते आर्यन खान याच्या जामीनासाठी प्रयत्न करणार असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीने सर्व आरोपींची कोठडी वाढवून मागितली होती. मात्र आरोपींच्या वकिलाने याला विरोध करीत न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. (All the accused including Aryan Khan were remanded in judicial custody for 14 days) दरम्यान आर्यन खान याच्या जामीन अर्जावर उद्या 11 वाजता सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आर्यन खानच्या जामीनावर NCB ला उद्या सकाळी उत्तर देण्यात कोर्टाने सांगितलं आहे. त्याशिवाय हे उत्तर लिखित स्वरुपात द्यावं लागेल. आम्ही या जामीनाला विरोध करणार असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. हे ही वाचा-आर्यन खानसोबत दिसलेल्या BJP नेत्याचं स्पष्टीकरण, सांगितलं... आर्यनविरुद्धचा खटला कमकुवत नाही आर्यन खानविरुद्धच्या ड्रग्सचा खटला प्रामुख्याने दोन पुराव्यांवर आधारित आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यानं दावा केला आहे की, ते पुरावे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे असतील. आर्यन खानची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आर्यन खानने एनसीबीला दिलेल्या जबाबाची सत्यता अद्याप न्यायालयात सिद्ध करणे बाकी आहे. आर्यन खानविरोधातील दुसरा पुरावा म्हणजे त्याचं व्हॉट्सअॅप चॅट असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aryan khan, Court, Drugs, Mumbai, NCB

    पुढील बातम्या