अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ, खास मित्राला एनसीबीकडून अटक

अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ, खास मित्राला एनसीबीकडून अटक

एनसीबीने पॉलची गुरुवारी चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक केली आहे. तर अर्जुन रामपालला 11 वाजता चौकशीला हजर राहावे लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक लवकरच अभिनेता अर्जुन रामपालची (Arjun Rampal) चौकशी करणार आहे. पण, त्याआधी त्याच्या मित्राला एनसीबीने  अटक केली आहे.

एनसीबीने आज सकाळी अर्जुनचा जवळचा मित्र पॉल ग्रियाड (Paul Griyad) याला अटक केली आहे. एनसीबीने पॉलची गुरुवारी चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक केली आहे. त्यांची आणखी चौकशी केली जाणार आहे. पॉल हा एक ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट आणि मुंबई येथे राहणारा व्यापारी आहे. पॉल हा अर्जुन रामपालचा जवळचा मित्र आहे. अर्जुनच्या गर्लफ्रेंडचा भाऊ अ‍ॅगिसिलास डीमेट्रिएड्स (Agisilaos Demetriades) याच्याशी पॉलचा व्यावसायिक व्यवहार होता. एनसीबीने दावा केला आहे की, पॉल अ‍ॅजिसिलोसकडून बंदी असलेली औषधं खरेदी करीत होता. या प्रकरणात अटक करण्यात येणारा पॉल हा दुसरा परदेशी नागरिक आहे.

दिवाळीच्या दिवसांत टाळा 5 चुका, अन्यथा लायसन रद्द होऊ शकतं

त्याआधी गुरुवारी एनसीबीने  अर्जुन रामपालला समन्स पाठवला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी त्याला हजर राहावे लागणार आहे.  काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स (Gabriella Demetriade) हिची देखील चौकशी केली. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, Gabriella गुरुवारी देखील एनसीबीसमोर हजर झाली होती. बुधवारी गॅब्रिएलाची एकूण 6 तास चौकशी झाली होती.

ज्याच्या हत्येची केस केली बंद, तो 2 वर्षांनी परतला; पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा

सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जुन रामपाल याच्या घरातून काही बंदी असणारी मेडिसिन्स जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली ही औषधं NDPS कायद्याअंतर्गत येतात. याप्रकरणी अर्जुनच्या गर्लफ्रेंडची चौकशी झाली.

Published by: sachin Salve
First published: November 13, 2020, 10:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या