मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

फिटनेस नाही तर आहे भयंकर कारण; म्हणून 53व्या वर्षी अजय लिफ्ट न वापरता कितीही मजले चालत जातो

फिटनेस नाही तर आहे भयंकर कारण; म्हणून 53व्या वर्षी अजय लिफ्ट न वापरता कितीही मजले चालत जातो

अजय देवगण

अजय देवगण

अभिनेता अजय देवगण 53व्या वर्षीही लिफ्टचा वापर न करता चालत जातो. या मागे फिटनेस नाही तर एक भयंकर प्रसंग कारणीभूत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 28 नोव्हेंबर : अभिनेत अजय देवगण सध्या चांगलाच चर्चेत आहे.  दृश्यम 2 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दृश्य 2च्या निमित्तानं अजयचा जुना अंदाज पुन्हा पाहायला मिळाला. अजय देवगण त्याच्या अनोख्या स्टाइलमुळे आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे ओळखला जातो. कधी थ्रिलर सिनेमा कधी कॉमेडी तर कधी अँक्शन सिनेमांसाठी अजय देवगण ओळखला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का अभिनेत्याला एका गोष्टीची प्रचंड भिती वाटते ती गोष्ट म्हणजे लिफ्ट.   सध्या अजय दृश्यम 2च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.याच दरम्यान त्यानं लिफ्टमध्ये त्याच्याबरोबर घडलेल्या त्या वाईट घटनेविषयी खुलासा केला.

अजय देवगण नुकताच द कपिल शर्माच्या शो मध्ये आला होता. यावेळी गप्पा मारताना त्यानं अनेक खुलासे केले. कपिल शर्मा त्याच्या शोमध्ये आलेल्या पाहुण्यांना आधी पोट दुखेपर्यंत हसवतो आणि त्यानंतर त्याला काही प्रश्न विचारत मनातील गोष्ट काढून घेतो.  असंच काहीस त्यानं अजयबरोबरही केलं. हसता हसता अजयनं त्याला न आवडणाऱ्या भिती वाटणाऱ्या लिफ्टबद्दल सांगून टाकलं. अजय म्हणाला, मला बंद, छोट्या जागा आवडत नाहीत. तिथे मला भिती वाटते कारण माझ्याबरोबर अशा जागेत फार वाईट घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - Happy Birthday Yami Gautam : बनायचं होतं IAS पण वडिलांच्या 'त्या' मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय म्हणाला, 'मी एकदा लिफ्ट होतो. तेव्हा लिफ्ट अचानक थांबली आणि तिसऱ्या चौथ्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये येऊन जोरात आदळली. आम्ही जवळपास दीड तासांहून अधिक वेळ लिफ्टमध्ये अडकलो होतो. तेव्हापासून मी लिफ्टमध्ये गेल्यानंतर क्लॉस्ट्रोफोबिक फिल करतो. या घटनेनंतर मी लिफ्टनं जाणंच बंद केलं. मी लिफ्टचा वापर करत नाही. कितीही फ्लोर असो मी चालत जातो. मी आजही हे फॉलो करतोय. मी फिल्ट ऐवजी चालत जातो'.

सध्या दृश्यम 2ची सर्वत्र हवा आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अजयबरोबर सिनेमात तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना, इशिता दत्ता हे कलाकारही आहेत. दृश्यम 2हा मल्याळम दृश्य2 या सिनेमाचा ऑफिशिअल रिमेक आहे.  सिनेमानं आतापर्यंत 100 करोडची कमाई केली आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News