मुंबई. 26 ऑगस्ट- अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी ड्रीम गर्ल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता तुफान वाढली. यानंतर सिनेमातील राधे राधे गाण्यावर थिरकल्यानंतर आयुष्मान पहिल्यांदा मराठी गाण्याच्या रीमिक्सवर नाचताना दिसणार आहे, तेही फक्त रितेश देशमुखच्या सांगण्यावरून.
ड्रीम गर्ल सिनेमासाठी दादा कोंडके यांच्या ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं या सुपरहिट गाण्याच्या रिमिक्सवर आयुष्मान आणि नुसरत थिरकताना दिसणार आहे. आयुष्मान पहिल्यांदा मराठी गाण्यावर डान्स करणार आहे. विशेष म्हणजे नुकतंच या गाण्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. येत्या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे गाणं प्रदर्शित होणार आहे. यात आयुष्मान आणि नुसरतच्या जोडीला असणार आहे तो बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख.
रितेशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर गाण्याचा प्रोमो शेअर केला. यात गणपतीसमोर रितेश उभा राहिलेला दिसत आहे. यानंतर रितेश आयुष्मानला 'आतापर्यंत प्रत्येक हिंदी सिनेमाचं प्रमोशन गाणं हे पंजाबीमध्येच असतं. यावेळी मराठीत होऊ दे का...' असा प्रश्न विचारतो. यावर आयुषअमानही त्याला हो असं उत्तर देतो. हे गाणं उद्या प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांची या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री नुसरत भरूचा, अन्नू कपूर, विजय राज, मनजोत सिंह, निधि बिष्ट, राजेश शर्मा, अभिषेक बनर्जी आणि राज भंसाली यांसारखे तगडे कलाकार दिसणार आहेत. राज शांडिल्य दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 13 सप्टेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे.
अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप, प्रेग्नंट असल्याची झाली होती चर्चा
बॉलिवूडच्या एक पाऊल पुढेच अल्लू अर्जुन, त्याच्या रेंज रोवरची किंमत एकदा वाचाच!
...आणि अचानक अक्षय कुमारच्या मुलाच्या मागे लागले भिकारी
VIDEO: हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; तापी नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.