चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली अभिनेत्री, नंतर घडलं असं काही की...

चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली अभिनेत्री, नंतर घडलं असं काही की...

ही अभिनेत्री घाईघाईत चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली होती आणि जे काही तिच्यासोबत घडलं त्याचा अनुभव सर्वांशी शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 08 सप्टेंबर : अभिनेता आयुष्यमान खुराना आणि नुसरत भारुचा सध्या त्यांचा आगामी सिनेमा ‘ड्रीम गर्ल’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या प्रमोशन दरम्यान असा एक खुलासा केला ज्यामुळे सर्वांनाच हसू आवरेनासं झालं. स्पॉटबॉय-ईला दिलेल्या मुलाखतीत नुसरतनं तिला आलेला एक विचित्र अनुभव शेअर केला. ज्याप्रमाणे आयुष्यमान मुलगी होऊन लोकांशी बोलतो, त्याप्रमाणे तुला काही उलट-सुलट अनुभव आला आहे का? असा प्रश्न यावेळी नुसरतला विचारण्यात आला. यावर नुसरतनं ती चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली होती आणि जे काही तिच्यासोबत घडलं त्याचा अनुभव सर्वांशी शेअर केला.

नुसरत म्हणाली, एकदा मी चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेले. पण बरं झालं आत कोणीच नव्हतं. मी लगेचच धावत बाहेर आले. बरं झालं त्यावेळी आत कोणी नव्हतं आणि बाहेरुनही कोणी आत आलं नाही. नाहीतर सर्वासमोर माझी लाज गेली असती.

वाचा :Birthday Special : 'त्या' निर्णयामुळे आशा भोसले लता दीदींपासून होत्या दुरावल्या

टॉयलेटवरील चिन्हामुळे होतो गोंधळ

नुसरत सांगते, ‘सध्या अनेक टॉयलेट्सवर वेगवेगळी चिन्ह असतात. ज्यामुळे कोणतं टॉयलेट पुरुषांचं आणि कोणतं महिलांचं हे समजतं मात्र त्यात खूप क्रिएटीव्हीटी केल्यानं अनेकदा गोंधळ उडतो.’

नुसरत आणि आयुष्यमानच्या सिनेमाबद्दल बोलायचं तर यात आयुष्यमान अशा मुलाची भूमिका साकारत आहे जो नोकरीसाठी मुलीच्या आवाजात बोलायला तयार होतो. कॉल सेंटरमध्ये त्याला नोकरी तर मिळून जाते मात्र पण सोबतच एक नवं नावही त्याला मिळतं. त्यानंतर पूजा नावाच्या या मुलीसाठी लोकं जीव ओवाळून टाकायला तयार होतात आणि त्यानंतर तिथे जो काही गोधंळ उडतो तो खरंच पाहाण्यासारखा आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा सिनेमा 13 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अण्णांच्या 'या' एका निर्णयानं घरातल्यांना बसतो जबरदस्त धक्का

================================================================

असे असतील मुंबईतील 3 नवीन मेट्रो मार्ग, पाहा SPECIAL REPORT

First published: September 8, 2019, 11:25 AM IST

ताज्या बातम्या