नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे कोरोना पॉझिटिव्ह, तब्येत बिघडल्याने लीलावती रुग्णालयात हलवलं

नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे कोरोना पॉझिटिव्ह, तब्येत बिघडल्याने लीलावती रुग्णालयात हलवलं

गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता, आज तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं

  • Share this:

मुंबई, 6 ऑगस्ट : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी विजय केंकरे यांच्या आई ललिता केंकरे यांचं नुकतच निधन झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून केंकरेंना सौम्य ताप येत होता. त्यामुळे ते होम क्वारंटाईन होते. मात्र आता त्यांना वांद्रे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आज त्यांची तब्येत बिघडल्याने लीलावती रुग्णालयात हलविण्यात आलं. गेल्या 8 ते 9 दिवसांपासून त्यांना सातत्याने ताप येत आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती अभिनेते विनय येडेकर यांनी दिली. विजय केंकरे यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. शिवाय सुयोग या संस्थेची सर्वाधिक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत त्यांचं नाव  अत्यंत आदराने घेतलं जातं.

हे वाचा-कधी मिळणार अभिषेक बच्चनला डिस्चार्ज? स्वत: PHOTO शेअर करून दिलं उत्तर

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. बिग बी अभिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय व त्यांची मुलगी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील अभिषेक बच्चन अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. विजय केंकरे यांनी पुलं देशपांडे यांच्या चित्रपटात त्यांच्या वृद्ध वयातील भूमिका साकारली होती.

Published by: Meenal Gangurde
First published: August 6, 2020, 11:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या