S M L

डॉ.लहानेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर, 20 हजार चौरस फुटाचं पोस्टर लाँच

मात्र या चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा अनोख्या पद्धतीने करण्यात आली.

Sachin Salve | Updated On: Nov 24, 2017 08:52 PM IST

डॉ.लहानेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर, 20 हजार चौरस फुटाचं पोस्टर लाँच

24 नोव्हेंबर : नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर बनलेल्या सिनेमाचं आता जोरदार प्रमोशन सुरू झालंय. हा सिनेमा कधी रिलीज होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र या रिलीज डेटची घोषणा अनोख्या पद्धतीने करण्यात आली.

"कथा मातृत्वाची, कथा त्यागाची, कथा  संघर्षाची, कथा जिद्धीची" असलेला  चित्रपट "डॉ. तात्याराव लहाने...अंगार ... पाॅवर इज विदीन" हा  विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माती मधुमालती वानखेडे यांनी या सिनेमाच्या 20,000 हजार चौरस फुटाचं भलमोठं पोस्टर रिव्हील करून या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली. हा सिनेमा तरुणांना नवा संदेश आणि प्रेरणा देणारा ठरेल असं निर्मात्यांना वाटतंय. या वर्षी रिलीज होऊ पाहणारा हा सिनेमा आता मात्र पुढच्या वर्षी 12 जानेवारीला रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 08:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close