मुंबई, 25 जानेवारी- प्रजासत्ताक दिनाच्या
(Republic day 2022) पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कार्थींची नावं जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे
(Dr.Prabha Atre) यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहिर झाला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ गायिका सुलोचना दीदी
(Sulochana Chavan) आणि बॉलिवूड गायक सोनू निगम
(Soun Niagm) यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्म पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले देशाचे पहिले सीडीओ जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाले आहे. एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. याशिवाय नीरज चोप्रा यांना पद्मश्री, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण व कला क्षेत्रात राधेश्याम खेमका यांना देखील पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे.
सुलोचना चव्हाण यांच्याविषयी थोडसं...
महाराष्ट्रातील ज्येष्ठ लावणी गायिका, पार्श्वगीत गायिका. फडावरची लावणी त्यांनी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केली तशीच ती थेट माजघरापर्यंत पोहचविली. त्यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे विवाहापूर्वीचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्यांचे शिक्षण जेमतेम चौथ्या इयत्तेपर्यंत झाले आहे. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. ... त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता "श्रीकृष्ण बाळमेळा". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते.
वाचा-
Lata Mangeshkar यांची प्रकृती स्थिर पण...; डॉक्टरांनी दिली नवी Update
सोनू निगम यांच्याविषयी थोडसं
सोनू निगम यांच्याविषयी सांगायचे तर त्यांनी अनेक बॉलिवूड गाण्यांना आवाज दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी कन्नड़, उड़िया, पंजाबी, बंगाली, मराठी या भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत. त्यांनीकरिअरमध्ये एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. शाहरूख ते सलमान यासाऱख्या स्टार्सनां त्यांनी आवाज दिला आहे.
वाचा-
'आई होण्याचा विचार नाही', घटस्फोटानंतर बदलले अभिनेत्रीचे विचार
महाराष्ट्रासाठी जाहीर झाले पद्म पुरस्कार
पद्मविभूषण
कला - प्रभा अत्रे
पद्मभूषण
उद्योग - नटरंजन चंद्रशेखरन
आरोग्य - सायरस पुनवाला
पद्मश्री
आरोग्य - हिंमतराव बावस्कर
आरोग्य - विजयकुमार विनायक डोंगरे
कला - सुलोचना चव्हाण
कला - सोनू निगम
विज्ञान आणि इंजिनियरिंग - अनिलकुमार राजवंशी
आरोग्य - भीमसेन सिंघल
आरोग्य - बालाजी तांबे (मरणोत्तर)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.