जेवणात मद्य प्यायचं का? काय आहे डाॅ. दीक्षितांचं उत्तर?

जेवणात मद्य प्यायचं का? काय आहे डाॅ. दीक्षितांचं उत्तर?

'कानाला खडा' या शोमध्ये अनेक सेलिब्रिटीज हजेरी लावत असतात. यावेळी या शोमध्ये येणार आहेत खास सेलिब्रिटी. त्यांचं नाव हल्ली प्रत्येकाच्याच तोंडी आहे. ते म्हणजे आहारतज्ज्ञ डाॅ. जगन्नाथ दीक्षित.

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : 'कानाला खडा' या शोमध्ये अनेक सेलिब्रिटीज हजेरी लावत असतात. संजय मोनेच्या गुगली प्रश्नांना चांगले चौकार, षटकार उत्तरं देत असतात. यावेळी या शोमध्ये येणार आहेत खास सेलिब्रिटी. त्यांचं नाव हल्ली प्रत्येकाच्याच तोंडी आहे. ते म्हणजे आहारतज्ज्ञ डाॅ. जगन्नाथ दीक्षित.

हल्ली अनेक घरात एक तरी व्यक्ती अशी असते जी दीक्षित डाएट करत असते. डायबेटिस  आणि वजन कमी करणं यासाठी दीक्षित डाएट लोक करतात. दिवसातून फक्त दोनदाच जेवायचं. तेही 55 मिनिटांच्या आत जेवण संपवायचं. हा सल्ला ते सगळ्यांना देतात.

कानाला खडा कार्यक्रमात दीक्षितांनी अनेक अनुभव शेअर केले. एक महिला त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, तुमच्या डाएटचा खूप फायदा झाला. दीक्षितांनी विचारलं, तुम्हाला झाला का? त्यावर ती म्हणाली माझ्या नवऱ्याला. फायदा काय तर नियमित गुटखा खाणाऱ्या तिच्या नवऱ्याची ही सवय फक्त दोनदाच जेवायचं असल्यानं सुटली.

डाॅक्टर सांगतात, काही जण येतात आणि विचारतात डाॅक्टर दोन पेग रोज घ्यायची सवय आहे. काय करू? त्यावर ते म्हणतात, जे काही करायचंय ते 55 मिनिटांत करा. पण लिव्हर बिघडण्याची जबाबदारी तुमची.

या मनमोकळ्या गप्पांमध्ये दीक्षितांनी सौष्ठवाच्या चुकीच्या कल्पनांवर बोट ठेवलंय. सिक्सपॅक वगैरे प्रकार टिकत नाहीत. ते अनैसर्गिक आहे. ते म्हणाले, आहाराबरोबर रोज 45 मिनिटं साडेचार किमी. चाललं पाहिजे.

एखाद्याला व्यायाम करणं जमत नसेल त्यानं सायकलिंग करा. अगदी पलंगावर आडवं झोपून हवेत सायकलिंग केलंत तरी त्याचा परिणाम होईल. अनेक पोलिओ पेशंटनीही असंच वजन कमी केलं, असं त्यांनी सांगितलं.

VIDEO : प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले...

First published: April 19, 2019, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading