• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • भारी कोल्हापुरी! अमोल कोल्हेंनी 6 वर्षांनी या पदार्थावर मारला अस्सा ताव की...

भारी कोल्हापुरी! अमोल कोल्हेंनी 6 वर्षांनी या पदार्थावर मारला अस्सा ताव की...

कोल्हापूरची (kolhapur Food ) खाद्य संस्कृती जगात भारी आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (dr amol kolhe) देखील कोल्हापूरच्या प्रेमात आहेत.

 • Share this:
  कोल्हापूर, 20 नोव्हेंबर- कोल्हापूरची  (kolhapur Food ) खाद्य संस्कृती जगात भारी आहे. इथला तांबडा पांढर रस्सा असेल किंवा मिसळ किंवा मटणााचं लोणचं सगळचं लयभारी आहे. अनेक जण कोल्हापूरला खास खाण्यासाठी येतात. कारण इथल्य पाण्याल आणि माणसांना जगात कशाची तोड नाही. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (dr amol kolhe)   देखील कोल्हापूरच्या प्रेमात आहेत. सोशल मीडियावर त्यांनी कोल्हपूरच्या प्रसिद्ध अशा झाडाखालच्या वड्यासाठी पोस्ट लिहित कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीविषयी प्रेम व्यक्त केले आहे. अमोल कोल्हे यांनी इन्स्टावर काही फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, कोल्हापूरकरांसाठी परिचित असणारं नाव 'झाडाखालचा वडापाव.'‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ च्या प्रेस कॉन्फरन्स च्या निमित्ताने कोल्हापूर ला जाणं झालंआणि 2015 सालच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.. वाचा : Bigg Boss 15: बिग बॉसमध्ये बिग ट्विस्ट; 'या' स्पर्धकांची घरात पुन्हा होणार एन्ट्री! याच ठिकाणी खरंतर जगदंब क्रिएशन्सच्या निर्मितीची सुरवात झाली होती,जेव्हा कोल्हापूरात शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्तानं 2015 मध्ये गेलो होतो..आणि रोज सकाळचा नित्यक्रम होता तो म्हणजे 'झाडाखालचा वडापाव' ला जाऊन कट वडा खायचा..!आता झाडाखालचा वडापावचं बदललेलं रूप पाहिलं आणि आनंदाची / कौतुकाची गोष्ट अशी आहे की चव आणि क्वालिटी तशीच आहे.. आणि जी व्यावसायिक भरारी याचे मालक शौकत मुकादम यांनी घेतली आहे, ती अभिनंदनीय आहे.. पुन्हा एकदा झाडाखालच्या वडापावची चव चाखताना शौकत मुकादम यांचं यश हे डोळ्यासमोर दिसत होतं..आणि या कष्टाचं आणि मेहनतीचं कौतुक करावंसं वाटलं.. पुन्हा एकदा कोल्हापूरच्या वास्तव्यातील आठवणी जाग्या झाल्या..!
  शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणार्‍या रणरागिणी ताराराणी यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ (swaraj saudamini tararani) ही मालिका सोमवारपासून (दि. 15) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका निर्मिती करणारी जगदंब क्रिएशनची टीम, कलाकार यांनी रविवारी छत्रपतींची राजधानी असणार्‍या करवीरला (कोल्हापूर) भेट दिली. यावेळी ताराराणी चौकातील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व कलाकार मंडळीनीं मिळून मालिकेचं जोरदार प्रमोशन केले. यावेळी ताराणी चौक संपूर्ण फुलांनी सजवला होता. वाचा : अनुष्का रंजनच्या मेहंदीत आलिया भट्टचा No Makeup लुक; फोटो पाहून चाहत्यांनी केली वाह-वाह डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: