मुंबई. 27 ऑक्टोबर : अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी (Amol Kolhe) सोशल मीडिया वापरण्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत दिली आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत म्हटलं आहे की, इन्स्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की पोस्ट वर प्रतिक्रिया देताना "अभिनेता" की "नेता"अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच एक निर्णय घेतला आहे- इन्स्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही. म्हणजे confusion नको. राजकीय पोस्ट साठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना? , अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
View this post on Instagram
यासोबतच त्यांनी एक टीप दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून मांडलेल्या विचाराला राजकीय भूमिका समजण्यात येऊ नये. सोशल मिडियावर नेटकरी अमोल कोल्हे यांच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत.
वाचा : 'मराठी इंडस्ट्रीतले मित्र असे कसे? ' क्रांतीच्या समर्थनार्थ अभिनेत्याचं Tweet
डॉ. अमोल कोल्हे अभिनयासोबत आता राजकारणात देखील उत्तम काम करताना दिसत आहेत. कधी कधी खासदार कधी अभिनय अशी दुहेरी जबाबदारी अमोल कोल्हे पेलताना दिसतात. अमोल कोल्हे यांनी यासंबंधी पोस्ट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
वाचा : चित्रपटांपासूनदूर असणारी पूजा बत्रा कशी कमावते कोट्यवधी रुपये? जाणून घ्या डिटेल्
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिक त्यांच्याकडे कायम आदराने पाहतात. याच इमेजचा फायदा उठवत अमोल कोल्हे यांनी मोदी लाटेतही लोकसभेची निवडणूक जिंकली. 2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. यामध्ये अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. आतादेखील ते जेव्हा एखाद्या मुद्द्यावर बोलतात तेव्हा ग्रामीण भागात त्याची बऱ्यापैकी चर्चा रंगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, NCP