(हे वाचा-धर्मेशने सान्या मल्होत्राला केलं होतं रिजेक्ट; 6 वर्षांपूर्वी दिली होती ऑडिशन) हा चित्रपट भारतीय महिला वनडे क्रिकेट टीमची कप्तान मिथाली (Mithali Raj) राजच्या जीवनावर अधारित आहे. यामध्ये तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात फिट दिसण्यासाठी तापसी मैदानात घाम गाळताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात तापसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लब्स आणि हेलमेट घालून धावपट्टीवर क्रिकेटच्या विविध शॉट्सचा सराव करताना दिसत आहे. (हे वाचा- 'रश्मी रॉकेट' सिनेमातला PHOTO व्हायरल; या भूमिकेत दिसणार तापसी पन्नू) तिने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती क्रिकेटमधली Down the line शॉट खेळण्याचा सराव करत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं असून अवघ्या एका तासात या फोटोला 1 लाखाहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. तापसी पन्नु मिथाली राजच्या व्यक्तीरेखेसाठी स्वतःला तयार करत आहे. त्यासाठी ती खूप सराव करत आहे. आता तापसीची देहबोली महिला क्रिकेटर सारखी दिसू लागली आहे. तापसी मिथालीच्या शैलीने फलंदाजी करण्याची कला अवगत करण्याचा प्रयत्न करत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Mithali raj, Taapsee Pannu