मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुष्मिता सेनच्या एक्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती हुमा; चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना झालं ब्रेकअप

सुष्मिता सेनच्या एक्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती हुमा; चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना झालं ब्रेकअप

हुमा कुरेशी

हुमा कुरेशी

कित्येक दिवसांनी हुमाचा नवाकोरा चित्रपट प्रदर्शित होत असताना आता तिच्या लव्ह लाईफमध्ये मोठा भूकंप आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 ऑक्टोबर : 'गँग्स ऑफ वासेपुर'मधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी. या अभिनेत्रीने मोजक्याच परंतु दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. येणाऱ्या काळात तिचा 'डबल एक्सएल' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'डबल एक्सएल' चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. याआधी हुमाच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. कित्येक दिवसांनी तिचा नवाकोरा चित्रपट प्रदर्शित होत असताना आता तिच्या लव्ह लाईफमध्ये मोठा भूकंप आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून हुमा बॉलिवूड दिग्दर्शकाला डेट करत होती. आता या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याची चर्चा आहे. हुमा आणि तिचा प्रियकर मुदस्सर अजीज यांचे ब्रेकअप झाले आहे. जवळपास ३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हुमा आणि मुदस्सर वेगळे झाले आहेत, मात्र त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हुमाच्या आधी मुदस्सरचे नाव लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत जोडले गेले होते, दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

हेही वाचा - Sonakshi sinha: 'बॉलिवूडमध्ये नायिकांसोबत नेहमीच भेदभाव'; सोनाक्षी सिन्हाचं मोठं वक्तव्य

‘ईटाइम्स’च्या वृत्तानुसार, हुमा आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचं ब्रेकअप झालं आहे. पण ब्रेकअपनंतरही या दोघांमध्ये मैत्रीचं नातं असणार आहे. इतकंच नव्हे तर दोघंही मिळून यापुढेही चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. दोघांमध्ये कोणतेच मतभेद नसून हुमा-मुदस्सरची मैत्री कायम असणार आहे. हुमा आणि मुदस्सरचे एकत्र अनेक फोटो सोशल मीडियावर समोर येत आहेत, तर आता ब्रेकअपनंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. ब्रेकअपच्या बातम्यांबाबत हुमा किंवा मुदस्सरकडून काहीही सांगण्यात आलेले नसले तरी एका जवळच्या सूत्राने ETimes ला सांगितले की काही दिवसांपासून दोघांमध्ये काही ठीक चालले नव्हते.यामुळे त्यांनी त्यांचे नाते संपुष्टात आणले.

मुदस्सर विषयी सांगायचं तर तो हुमाच्या आधी अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट करत होता. काही वर्ष सुष्मिता-मुदस्सर एकत्र होते. पण त्यानंतर काही वर्षांनी दोघांच्या नात्याचा दि एण्ड झाला. त्यानंतर हुमा-मुदस्सर एकमेकांच्या जवळ आले. मात्र आता या दोघांच्या नात्याचा शेवट झाला आहे.

विशेष म्हणजे  हुमाच्या 'डबल एक्सएल' चित्रपटाचा लेखक तिचा माजी प्रियकर मुदस्सर अजीज आहे. हुमा शेवटची लोकप्रिय वेब सीरिज 'महाराणी 2' मध्ये दिसली होती. हुमा आणि सोनाक्षीचा 'डबल एक्सएल' हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. हुमा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील तणाव सोडून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात हुमा व्यतिरिक्त सोनाक्षी, झहीर इक्बाल, महत राघवेंद्र हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment