VIDEO: दूरदर्शनच्या ट्यूनवर तरुणाचा भन्नाट डान्स, टिक-टॉकचा हा व्हिडिओ एकदा पाहाच

VIDEO: दूरदर्शनच्या ट्यूनवर तरुणाचा भन्नाट डान्स, टिक-टॉकचा हा व्हिडिओ एकदा पाहाच

जर हा मुलगा दूरदर्शनच्या ट्यूनवर नाचू शकतो तर हा मुलगा जनरेटरच्या आवाजावरही नाचू शकतो.

  • Share this:

मुंबई, ०७ मार्च- सध्या भारताच्या तरुणाईमध्ये पबजी आणि टीक- टॉक या दोन गोष्टींचंच क्रेझ सर्वाधिक दिसून येत आहे. पबजीमधून वेळ मिळाला तर तरुणाई टिक- टॉक या व्हिडिओ अपवर व्हिडिओ अपलोड करत असतात. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे लोक प्रसिद्ध संवाद आणि गाण्यांवर अभिनय करतात आणि आपलं कौशल्य दाखवतात. सध्या या अपवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबईत राहणाऱ्या वैशाख नायर नावाच्या मुलाने दूरदर्शनच्या प्रसिद्ध सिग्नेचर ट्यूनवर ब्रेक डान्स केला आहे. वैशाखचा हा व्हिडिओ इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे.

अनेक इंटरनेट युझर्सने वैशाखच्या या डान्सचं कौतुक केलं असून त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी त्यांना ९० च्या दशकाची आठवण झाल्याचे सांगितले. हा व्हिडिओ सर्वात जास्त ट्विटरवर पसंत करण्यात आला आहे. काहींनी या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, जर हा मुलगा दूरदर्शनच्या ट्यूनवर नाचू शकतो तर हा मुलगा जनरेटरच्या आवाजावरही नाचू शकतो.


काहींनी या व्हिडिओला कूलही म्हटलं. तर काहींनी याला टिक- टॉकचा सर्वात सुंदर व्हिडिओ म्हटलं आहे. या व्हिडिओला @Ya5Ne या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं. यात वैशाखने आपल्या ब्रेक डान्सने साऱ्यांचं मन जिंकलं. वैशाखने दूरदर्शनच्या सिग्नेचर ट्यूनच्या एक एक बीटला पकडलं आहे आणि त्यावर ब्रेक डान्स केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दाना त्याने लिहिले की, ‘दूरदर्शने त्यांच्या स्वप्नातही याची कल्पना केली नसेल.’

स्वतः दूरदर्शनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ लाइक केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १३ हजारांहून अधिक लाइक्स आणि ५ हजारांहून रीट्वीट मिळाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 07:10 PM IST

ताज्या बातम्या