वाढदिवसाला दहशतवादावर नको बोलायला- आमीर खान

वाढदिवसाला दहशतवादावर नको बोलायला- आमीर खान

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमीर म्हणाला, वाढदिवसाच्या दिवशी दहशतवादावर नको बोलायला.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च: बॉलिवूडमधील संवेदनशील अभिनेता म्हणून आमीर खानची ओळख आहे. आमीर आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने पत्रकारांसोबत त्याने केक कापला आणि काही संवाद देखील साधला. तसेच देशातील काही घडामोडींवर भाष्य केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमीर म्हणाला, वाढदिवसाच्या दिवशी दहशतवादावर नको बोलायला.

आमीर खान आज त्याचा 54वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने पत्रकार परिषदेत त्याने केक कापला. यावेळी त्याची पत्नी किरण राव देखील उपस्थित होते. आमीरचा आगामी चित्रपट लालसिंग चढ्ढा हा असून त्याचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असल्याचे आमीर म्हणाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी 20 किलो वजन कमी केल्याचे त्याने सांगितले. वाढदिवसानिमित्तमुलगा आझाद आणि किरण राव यांनी केलेले पेंटिंग आमीरला वाढदिविसाचे भेट म्हणून देण्यात आले.

पाणी फाउंडेशनचे काम

यंदा कमी पाऊस पडल्याने पाणी फाऊंडेशनचे काम लवकर सुरु होणार असल्याचे आमीरने सांगितले. फाऊंडेशनचे हे चौथे वर्ष आहे. कमी पाऊस झाल्याने यंदा मोठी जबाबदारी आहे. यावेळी 7 हजार 200 गावांना प्रशिक्षण देणार असल्याचे आमीरने सांगितले.

सर्वांनी मतदान करावे

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक भारतीयाने मतदान केले पाहिजे, असे आमीरने सांगितले. अर्थात मी कोणासाठीही प्रचार करणार नाही. पण मतदान करण्याचे आवाहन नक्की करतो, असे तो म्हणाला. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवडूमधील अनेक कलाकारांना twitterवरुन मतदान करण्याविषयी प्रचार करण्याचे आवाहन केले होते.

सुजय पासून ते शरद पवारांपर्यंत काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? UNCUT पत्रकार परिषद

First published: March 14, 2019, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading