मुंबई, 10 ऑगस्ट : बॉलिवूडमधील जनतेचा चाहता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या संशयास्पद मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजमवर (Nepotism) मोठी चर्चा सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून यावर उलटसुटल चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या या चर्चेत कपूर कुटुंबाची मुलगी आणि सैफ अली खान याची पत्नी करिना कपूरने मोठं वक्तव्य केलं आहे.
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर तर हा व्हिडीओ टॉप ट्रेंडमध्ये आला आहे. या व्हिडीओत पत्रकार बरखा दत्त यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना करिनाने म्हटले आहे, की ‘लोकचं स्टार किड्सचे सिनेमे पाहाण्यासाठी जातात..प्रेक्षकांनीच त्यांचा स्टार केलं आहे..नेपोटिजमचा विरोध करणाऱ्यांनी लोकांवरही प्रश्न उपस्थित करायला हवा..तुम्हाला नसेल जायचं तर नका जाऊ, सिनेमा पाहण्यासाठी कोणी जबरदस्ती करीत नाही. ‘
@pinkvilla She herself, told that ''maat dekho movie, kisine force thodi ki hai'' So, nhi dekhenge :). arrogance me toh bol dia abb dekhna audience k power .. #KareenaKapoorKhan
करिना कपूरच्या या व्हिडीओची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. नेपोटिजम विरोधी प्रेक्षकांनी करिना कपूरला खूप ट्रोल केलं जात आहे. अनेक वापरकर्त्यांनी यापुढे स्टार किड्सचे चित्रपट पाहणार नसल्याचं सांगितलं आहे. सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या नेपोटिजमवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेपाटिजममुळे अनेकदा गुणवत्ता असतानाही संधी मिळत नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.