Home /News /entertainment /

'आम्हाला यात ओढू नकोस'; काश्मिरी पंडितांच्या वक्तव्यामुळे लेखक भडकला, कंगनाची केली कानउघडणी

'आम्हाला यात ओढू नकोस'; काश्मिरी पंडितांच्या वक्तव्यामुळे लेखक भडकला, कंगनाची केली कानउघडणी

या लेखकाने कंगनाला चांगलंच सुनावलं आहे

    नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : सध्या देशभरात कंगना रणौतवरुन तुफान चर्चा सुरू आहे. मुंबईला पीओके म्हटल्यानंतर कंगनाविरोधात शिवसेना नेता संजय राऊत यांनी तोफ डागली. या प्रकरणात पालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग अनधिकृत असल्याचे सांगत तोडला आहे. यानंतर कंगनाने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाने एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी कंगना म्हणाली, सध्या सुरू असलेल्या प्रकरणावरुन काश्मिरी पंडितांना काय भोगावं लागलं असेल याची जाणीव होते. त्यामुळे मी काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनविणार असल्याचे तिने यावेळी सांगितले. मात्र तिच्या या घोषणेनंतर एका लेखकाने नाराजी व्यक्त केली आहे. शिकारा या चित्रपटाचे लेखक राहुल पंडिता यांनी कंगनाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. केवळ काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवल्याने तुम्ही त्यांचं दु:ख समजू शकत नाही, ट्विट करीत त्यांनी कंगनाच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मला क्षमा करा...पण तुमच्या कार्यालयाची भिंत पाडण्यावरुन तुम्हाला काश्मिरी पंडितांचं दु:ख समजू शकत नाही. तीन दिवसात आपले केस पांढरे झाले की काय? वृद्ध लोक वनवासात मरतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपलं घर पाहण्यासाठी रडतात. स्वत:च्या फायद्यासाठी आमचं नाव घेऊ नका. आम्हाला तुमच्या अहंकाराच्या लढाईत प्यादं व्हायचं नाही. उद्या तुमच्या बोटाला जखम झाली तर तुम्ही म्हणाल की मला काश्मिरी पंडितांची वेदना समजली..असं होत नाही. अशा शब्दात पंडितांनी आपला राग व्यक्त केला. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित शिकारा या हिंदी चित्रपटाची कथा राहुल पंडिता यांनी लिहिली आहे. मात्र त्यांच्या या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Kangana ranaut

    पुढील बातम्या