News18 Lokmat

पुन्हा एकदा येतोय संदीप कुलकर्णीचा अँग्री यंग मॅन, सोबत राजेश्वरी सचदेव

आगामी बहुचर्चित "डोंबिवली रिटर्न" या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. जे जातं...तेच परत येतं? ही सिनेमाची कॅचलाइन आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 7, 2019 12:18 PM IST

पुन्हा एकदा येतोय संदीप कुलकर्णीचा अँग्री यंग मॅन, सोबत राजेश्वरी सचदेव

मुंबई, 07 जानेवारी : डोंबिवली फास्ट हा सिनेमा रिलीज झाला होता, तेव्हा मराठी सिनेमात क्रांती आल्याची भावना निर्माण झाली होती. खरोखर त्यानंतर हळूहळू मराठी सिनेमाचं रूपच पालटलं होतं. आता याच सिनेमाचा सीक्वल येतोय.

आगामी बहुचर्चित "डोंबिवली रिटर्न" या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. जे जातं...तेच परत येतं? ही सिनेमाची कॅचलाइन आहे. या चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. २२ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

महेंद्र तेरेदेसाई यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कथानकाचा नायक त्याची पत्नी आणि मुलीसह उभा आहे. त्या तिघांच्याही चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थतेचे आहेत. स्वाभाविकच त्यांच्या बाबतीत काय घडलं असेल याचं कुतूहल या पोस्टरमधून निर्माण होतं.

या सिनेमाबद्दल दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई सांगतात,  ' Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मुळ आहे.’ ही म्हण आपल्या मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे याचं चित्र उभं करणारा हा चित्रपट आहे. ही कथा मला  सुचली मुलुंड - सीएसटीच्या एका प्रवासात. संदीप कुलकर्णीला ती आवडली. आपला पहिला चित्रपट कसा असावा या बाबतीत मी आग्रही होतो. निर्माता म्हणून संदीपने तो आग्रह पूर्ण केला.'

महेंद्र तेरेदेसाई संदीप कुलकर्णीबद्दल सांगतात,  'नट म्हणून संदीप जितका प्रगल्भ आहे, तितकाच निर्माता म्हणूनही आहे. खरं तर तो माझा काॅलेजपासूनचा दोस्त. आम्ही एकत्र नाटकातून कामं केली होती. निर्माता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाचे प्रेमसूत्रचे मी संवादही लिहिले होते. या चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. नावामुळे हा 'डोंबिवली फास्ट'चा सिक्वेल आहे असं वाटेलही... पण यापेक्षा समर्पक दुसरं नाव सुचलंच नाही. उद्या झालीच त्याच्याशी तुलना तरीही बरंच आहे. एका चांगल्या चित्रपटाशी तुलना होणं केव्हाही चांगलंच.'

Loading...

22 फेब्रुवारीला रिलीज होणारा हा सिनेमा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत बनलाय.


VIDEO : जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...