मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘राधे’च्या 'सिटी मार' गाण्यावर डॉक्टर्सनी धरला ताल, पाहा भन्नाट VIDEO

‘राधे’च्या 'सिटी मार' गाण्यावर डॉक्टर्सनी धरला ताल, पाहा भन्नाट VIDEO

#Siti maar गाण्यावर आता चक्क हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सनी ताल धरला. (Doctors dancing on siti maar) कोविड दहशतीची छाया थोडी कमी करण्यासाठी पाहाच हा दिशा पाटनीने शेअर केलेला हलका फुलका VIDEO

  • Published by:  News Digital

मुंबई 15 मे : अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your most wanted bhai) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. तर सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. सलमानचा हा पहिला चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण प्रेक्षकांनी इथेही चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यातचं पाहायला मिळत आहे. शिवाय चित्रपटातील गाणीही हीट होताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच राधे चित्रपटातील ‘सिटी मार’ (Siti maar)  हे सलमान खान आणि अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) यांच्यावर चित्रित झालेलं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं होत.

गाणं प्रेक्षकांना चांगलच भावलं असून सध्या ट्रेंडिंगवर आहे. याच गाण्यावर आता चक्क दवाखान्यातील डॉक्टर्सनी ताल धरल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Doctors dancing on siti maar)

View this post on Instagram

A post shared by Team Disha (@teamdishap)

चित्रपटातील आभिनेत्री दिशा पाटनीने डॉक्टर्सचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वर तिच्या स्टोरीवर शेअर केला आहे. व्हिडीओत डॉक्टर्सचा एक ग्रुप अगदी आनंदाने या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. सध्या देशात चिंतेचं वातावरण आहे. अशातच आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. पण तरीही त्यातून त्यांनी आनंद शोधत हे सुंदर नृत्य केल्याने त्यांच्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तर त्यातून ते इतरांना प्रेरणाही देत आहेत.

कोरोनामुळं काय दिवस आले? टीव्हीवर झळकणारे कलाकार विकतायेत रस्त्यावर भाजी

ईदच्या मुहुर्तावर राधे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिल्याचं पाहयला मिळालं. Zee5 वर हा चित्रपट पाहता येत आहे. चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानी, जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), रणदीप हुडा (Randeep Hooda) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

First published:

Tags: Disha patani, Entertainment, Salman khan