Home /News /entertainment /

कोरोनानंतर मिलिंद सोमणने व्यक्त केली प्लाझ्मा दानाची इच्छा; डॉक्टरांकडून मात्र स्पष्ट नकार

कोरोनानंतर मिलिंद सोमणने व्यक्त केली प्लाझ्मा दानाची इच्छा; डॉक्टरांकडून मात्र स्पष्ट नकार

मिलिंद मुंबईतील एका रुग्णालायात प्लाझ्मा दान करण्यासाठी गेले होते. पण डॉक्टर्सने प्लाझ्मा घेण्यास नकार दिल्याने त्यानं निराश होऊन परतावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

  मुंबई 17  मे : प्रसिद्ध मॉडेल तसेच अभिनेते मिलिंद सोमण (Milind Soman)  हे आपल्या फिटनेस साठीही प्रसिद्ध आहेत. अनेकजन त्यांच्याकडून फिटनेसची प्रेरणा घेतात. तर काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी योग्य औषध तसेच व्यायामानंतर कोरोनावर मात केली. व त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांनी प्लाझ्मा दान (Plasma donation) करण्याचं ठरवलं. पण डॉक्टर्सनी मात्र त्यांचा प्लाझ्मा घेण्यास स्पष्ट नकार दिला. मिलिंद मुंबईतील एका रुग्णालायात प्लाझ्मा दान करण्यासाठी गेले होते. पण डॉक्टर्सने प्लाझ्मा घेण्यास नकार दिल्याने त्यानं निराश होऊन परतावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “पुन्हा जंगलात परतलो, प्लाझ्मा दान करण्यासाठी गेलो होतो पण पुरेशा अँटीबॉडीज (antibodies) नाहीत.”

  गीता कपूरने कोणाच्या नावाचं लावलं कुंकू? नवा PHOTO चाहते चकीत

  पुढे मिलिंद यांनी म्हटलं आहे, “प्लाझ्मा थेरपी पूर्णपणे उपयोगी आहे असं नाही पण उपचारांसाठी त्याचा उपयोग होतो. तेव्हा मी विचार केला, जे करता येईल ते करू. कमी अँटीबॉडीज म्हणजेच मला सौम्य कोरोनाची लश्रणं होती. पण ती इतर आजारांशी लढण्यासाठी पुरेशी आहेत. पण इतरांची मदत करू शकत नाही. थोटं वाईट वाटलं.”
  मिलिंद ने मदत करण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी न ठरल्याने त्यांना थोडं वाईट वाटत आहे. तर त्यानंतर त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर केली होती. मिलिंद सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचे जुने मॉडेलिंग काळातील फोटो शेअर केले होते. तर त्यावर त्यांना अनेक कमेंट्स मिळाल्या होत्या. व मिलिंदच्या तेव्हाच्या आणि आताच्या फिटनेसमध्ये चाहत्यांना काहीच फरक जाणवला नव्हता. त्यांचे जुने फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Milind soman

  पुढील बातम्या