या फोटोमध्ये तिचा लुक पाहता ही अभिनेत्री एकेकाळी 'मिस इंडिया' होती यावर विश्वासही बसत नाही. पण तिच्या स्वभावातला आपलेपणा अजून तसाच टिकून आहे. तिने हा फोटो शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा 2020 सालातला शेवटचा सेल्फी आहे. तिने आपल्या कॅप्शनमध्ये लिहीलं की, '2020 सालचा शेवट सुंदर आणि आकर्षक चंद्रासोबत'.The beautiful stunning moon 🌝 A powerful end to 2020 💫 pic.twitter.com/E9nYaoMytS
— Juhi Chawla (@iam_juhi) January 1, 2021
जुही चावलाने ट्वीटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या कुटुंबियासोबत आफ्रिकेतील नाइल नदीत पोहण्याचा आनंद लुटत आहे. नाइल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. त्यामुळे अशा नदीत पोहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सहसा लोकं या नदीत पोहण्याचा मोह आवरतात. कारण ही या नदीत मगरीचं प्रमाण अधिक आहे. पण जुही चावला आपल्या कुटुंबियांसोबत मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जुही चावलाने लाल रंगाच्या लाइफ जॅकेट परिधान केला आहे.Swimming in the Nile ,the one in the red life jacket ...that’s me😛 😁.. with Radha , Shiraz and Aryaman ... we didn’t last very long though ... the current was strong and we wondered what if the crocodiles came looking for lunch 😂😂😂... pic.twitter.com/wXq6JWhoTP
— Juhi Chawla (@iam_juhi) January 1, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress