मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पहिल्या शेवंताच्या तुलनेत नव्या अभिनेत्रीत काय आहे खास? UK मधून शिक्षण आणि...

पहिल्या शेवंताच्या तुलनेत नव्या अभिनेत्रीत काय आहे खास? UK मधून शिक्षण आणि...

शेवंता  (shevanta) फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने काही दिवसांपूर्वीच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.  आता अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंताच्या भूमिकेत दिसणार आहे.

शेवंता (shevanta) फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने काही दिवसांपूर्वीच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आता अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंताच्या भूमिकेत दिसणार आहे.

शेवंता (shevanta) फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने काही दिवसांपूर्वीच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आता अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंताच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर: शेवंता  (shevanta) फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने काही दिवसांपूर्वीच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिकेतील नवख्या कलाकारांकडून मिळत असलेली वागणूक आणि भूमिकेला पुरेसा वाव मिळत नसल्याने अपूर्वाने यापुढे शेवंताची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. अपूर्वाने मालिका सोडल्यानंतर दुसरी शेवंता कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यासोबतच ही नवखी अभिनेत्री ( krutika tulaskar)  या भूमिकेला न्याय देऊ शकेल का याची देखील चर्चा रंगली आहे. आता याच नवख्या शेवंताविषयी आपण जाणून घेणार आहे.

नवीन शेवंताने घेतलेय युके मधून मास्टर्सची डिग्री

अपूर्वा नेमळेकर हिने मालिका सोडताच शेवंताची भूमिका अभिनेत्री कृतिका तुळसकर साकारत आहे. कृतिका तुळसकर आपल्या वयाच्या दहाव्या वर्षापासूनच नाटकात काम करत आली आहे. बालपणापासून अभिनयाची आवड असल्याने कृतिकाने अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी वडिलांनी तिला अगोदर आपले शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. युके मधून मास्टर्सची डिग्री मिळवल्यानंतर तिने ह्यातच आपले करिअर करावे अशी तिच्या घरच्यांची अपेक्षा होती.

वाचा : Birthday Girl नेहा पेंडसेबद्दलची 'ही' गोष्ट माहिती आहे का?

घरच्यांचा विरोध झुगारून मुंबई गाठली

मात्र जेव्हा आपण अभिनय क्षेत्र करिअर म्हणून निवडणार असल्याचे कळवल्यानंतर कृतिकाला घरच्यांकडून विरोध व्हायला लागला. घरातून होणारा विरोध झुगारून कृतिकाने स्वप्नाचे शहर मुंबईत गाठलं. विविध ठिकाणी ऑडिशन देऊन नाटक, हिंदी, मराठी चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली. यानंतर लग्न बंबाळ हे नाटक तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं.खऱ्या अर्थाने कृतिकाच्या अभिनय प्रवासाची गाडी पटरीवर धावू लागली. कृतिकाला बाय गो बाय या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली. उलटसुलट, विजेता, वेडिंगचा शिनेमा, बबन अशा नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

आता शेवंतासारखील महत्त्वपूर्ण आणि तितकिच लोकप्रिया भूमिका साकारण्याची संधी मिळाली

या सगळ्या प्रवासात तिला झी मराठीसारख्या चॅनेलवर लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ज्या भूमिकेमुळे अपूर्वा नेमळेकर महाराष्ट्राच्या घरघरात पोहचली ती भूमिका साकारण्याची संधी कृतिकाला मिळाली आहे. अपूर्वाने साकारलेली शेवंता प्रेक्षकांची लोकप्रिय ठरली होती त्यामुळे कृतिकासाठी ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे कृतिका या भूमिकेस कितपत न्याय देणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial