Home /News /entertainment /

VIDEO: हृता दुर्गुळेच्या बॅगेत काय-काय? 'या' गोष्टीशिवाय राहूच शकत नाही अभिनेत्री

VIDEO: हृता दुर्गुळेच्या बॅगेत काय-काय? 'या' गोष्टीशिवाय राहूच शकत नाही अभिनेत्री

मराठी मालिकाविश्वात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी फारच कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळविली आहे. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule) होय. हृताने आपला सहजसुंदर अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 मे-   मराठी मालिकाविश्वात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी फारच कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळविली आहे. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे  (Hruta Durgule) होय. हृताने आपला सहजसुंदर अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.त्यामुळेच हृता मराठी मनोरंजनसृष्टीत इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी अभिनेत्री आहे. इन्स्टावर हृताचे तब्बल २.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. ही अभिनेत्री पडद्यावर जितकी लोकप्रिय आहे, तितकीच सोशल मीडियावरसुद्धा. त्यामुळे चाहते तिच्याबद्दल लहान-लहान गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आज आपण हृताबाबत अशाच काही गोष्टी जणू घेणारा आहोत. सर्वसामान्य मुली असो किंवा अभिनेत्री सर्वांना बॅग महत्वाची- सर्वसामान्य मुली असो किंवा अभिनेत्री या सर्वांना आपली बॅग खूप प्रिय असते. कारण या बॅगेत त्या आपला संपूर्ण संसार घेऊन फिरत असतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या बॅगेत मुली मेकअप प्रॉडक्टसपासून,औषधे, बॉडी केअर प्रॉडक्टस, पुस्तके, चॉकलेट्स अशा अनेक गोष्टी कॅरी करत असतात. आणि त्यात अभिनेत्री असतील तर सांगायलाच नको सेटवर लागणाऱ्या प्रत्येक आवश्यक वस्तू त्यांच्या बॅगेतून निघतात. हृता दुर्गुळे बॅगेत 'या' गोष्टी करते कॅरी- सध्या 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून हृता सर्वांचं मनोरंजन करत आहे. मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. हृताच्या चाहत्यांसाठी आज आम्ही एक खास गोष्ट सांगणार आहोत. अभिनेत्री सेटवर आपल्या सोबत जी बॅग कॅरी करते. त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात. हे आज आपण पाहणार आहोत.हृता आपल्या बॅगेत मेकअप पाऊच आवर्जून ठेवते. त्यांनतर अभिनेत्री एक डायरीसुद्धा कॅरी करते. यामध्ये ती आपल्या शूटिंगच्या तारखा, शूटिंगमध्ये आलेले अनुभव अशा गोष्टी लिहून ठेवते. त्यासोबत फेसवोश, परफ्युम,हॅन्डवोश, सॅनिटायझर अशा गोष्टी काळजीपूर्वक ठेवते. महत्वाचं म्हणजे या सर्वांआधी हृता आपल्या बॅगेत फोनचं चार्जर आणि पॉवरबँक ठेवते. या गोष्टीशिवाय आपण राहूच शकत नसल्याचं हृता सांगते. खरं तर हा व्हिडीओ 'फुलपाखरू' या मालिकेच्या सेटवरील आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या 'व्हॉट्स इन माय बॅग' या बॅग सेगमेंटमध्ये हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

    पुढील बातम्या