Home /News /entertainment /

बालवयात मोलमजुरी नंतर बनली अभिनेत्री,वाचा 1000 चित्रपटांमध्ये काम केलेल्या मनोरमांची रिअल स्टोरी

बालवयात मोलमजुरी नंतर बनली अभिनेत्री,वाचा 1000 चित्रपटांमध्ये काम केलेल्या मनोरमांची रिअल स्टोरी

साउथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मनोरमा (Manorama) यांचा आज (26 मे 22) 85वा जन्मदिवस आहे. 2013 मध्ये जगाचा निरोप घेतलेल्या या अभिनेत्रीने तमिळ चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

पुढे वाचा ...
     मुंबई, 26 मे-   साउथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मनोरमा (Manorama) यांचा आज (26 मे 22) 85वा जन्मदिवस आहे. 2013 मध्ये जगाचा निरोप घेतलेल्या या अभिनेत्रीने तमिळ चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मनोरमा यांना त्यांचे चाहते ‘आची’ या नावाने प्रेमाने हाक मारत. खरं तर मनोरमा यांचा चित्रपटसृष्टीत येण्याचा प्रवास सोपा नव्हता. मनोरमा यांच्या आईला कॅन्सर (Cancer) झाल्यानंतर त्या लोकांच्या घरात मोलकरीण म्हणून काम करायच्या. एकेदिवशी एक नाटक मंडळी अभिनयासोबत गाऊ शकणार्‍या अभिनेत्रीच्या शोधात होती. अशातच त्या मंडळीतील एका व्यक्तीची मनोरमा यांच्याशी भेट झाली आणि त्यांना जशी अभिनेत्री हवी होती, ते सर्व गुण त्यांना मनोरमा यांच्यात दिसले. त्यानंतर त्यांनी ‘अंधमन कढाली’ नाटकात काम केलं आणि मनोरमांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. आज आपण तमीळ चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री मनोरमा यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. गरिबीत गेलं बालपण मनोरमा यांचा जन्म त्या काळच्या मद्रासमधील तंजावूर येथे झाला. त्यांची आई लोकांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची. तिला कॅन्सर झाला. त्यामुळे मनोरमा यांनी वयाच्या 11 व्या वर्षी शाळा (School) सोडली आणि आईच्या जागी त्या मोलकरीण म्हणून काम करू लागल्या. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि मनोरमा घरकामातून जास्त कमवत नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या आईच्या उपचारांत अडचणी येत होत्या. या संदर्भात दैनिक भास्करने वृत्त दिलंय. अभिनय कारकिर्दीची सुरुवात अशातच एकदा एक नाटक मंडळी पल्लथूरला आली होती. त्यांच्या नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्रीला गाता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी या नाटकात मनोरमाला अभिनेत्रीची भूमिका दिली. तिथूनच वयाच्या 11 व्या वर्षी मनोरमा यांच्या अभिनय आणि गायनाची कारकीर्द सुरू झाली. मनोरमांचा अभिनय आणि गायन खूप चांगले होते, त्यामुळे नाटकांमध्ये काम करतानाच त्यांना ‘इनबावज्वू’ नावाच्या चित्रपटात (Movie) काम मिळालं. यानंतर मनोरमांना चित्रपटांमध्ये काम मिळत गेलं. एक हजारांहून जास्त चित्रपटांमध्ये केलं काम मनोरमा यांनी 1,200 चित्रपट आणि एक हजार नाटकांमध्ये काम केलं आहे. एक हजार चित्रपटांत काम करून त्यांनी गीनिज बुकमध्येही नाव नोंदवले आहे. तसंच त्या त्यांच्या कारकिर्दीत 5000 हून अधिक स्टेज परफॉर्मन्स केले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही (TV Serial) काम केलं. मनोरमा यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली. आपल्या आईपासून प्रेरणा घेत या भूमिका साकारल्याचं मनोरमा यांनी सांगितलं होतं. 5 मुख्यमंत्र्यांसोबत केलं काम मनोरमा यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत 5 मुख्यमंत्र्यांसोबत चित्रपटांत काम केलं. त्यांनी सीएन अण्णादुराई, एम. करुणानिधी, जे. जयललिता, एम.जी. रामचंद्रन यांनी एनटी रामाराव यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं. हे सर्वजण आधी चित्रपटसृष्टीत होते आणि नंतर राजकारणात सक्रिय झाले आणि नंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले होते. (हे वाचा: ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अशी झाली होती नीतूंची अवस्था, स्वतःला सावरण्यासाठी घेतली 'या' गोष्टीची मदत) राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक अवॉर्ड्सने सम्मान मनोरमा यांना 1989 मध्ये आलेल्या ‘पुढिया पढाई’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या राष्ट्रीय पुरस्काराने (National Award) सन्मानित करण्यात आले होते. तसंच चित्रपटांमधील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने 2002 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले होते. 2013 मध्ये केला शेवटचा चित्रपट मनोरमा शेवटच्या ‘थाये नी कन्नूरागु’ या शॉर्टफिल्ममध्ये (Short Film) दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी कॅन्सर पेशंटची भूमिका साकारली होती. त्या त्यांच्या विनोदी भूमिकांसाठीही ओळखल्या जातात. 2013मध्ये मनोरमा यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं. अशातच मनोरमा यांनी 10 ऑक्टोबर 2013 रोजी जगाचा निरोप घेतला.
    First published:

    Tags: Actress, Entertainment, South actress

    पुढील बातम्या