मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दिवाळीमध्ये चारचाकी खरेदी करताय? ह्या आहेत कमी किंमतीमध्ये जबरदस्त कार

दिवाळीमध्ये चारचाकी खरेदी करताय? ह्या आहेत कमी किंमतीमध्ये जबरदस्त कार

आपल्याकडे दसरा-दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर घर, कार यासारख्या अनेक नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. काही लोक तर फक्त दिवाळीला (Diwali) नवीन वस्तू खरेदी करता यावी म्हणून वर्षभर थांबतात.

आपल्याकडे दसरा-दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर घर, कार यासारख्या अनेक नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. काही लोक तर फक्त दिवाळीला (Diwali) नवीन वस्तू खरेदी करता यावी म्हणून वर्षभर थांबतात.

आपल्याकडे दसरा-दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर घर, कार यासारख्या अनेक नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. काही लोक तर फक्त दिवाळीला (Diwali) नवीन वस्तू खरेदी करता यावी म्हणून वर्षभर थांबतात.

   मुंबई,28ऑक्टोबर- आपल्याकडे दसरा-दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर घर, कार यासारख्या अनेक नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. काही लोक तर फक्त दिवाळीला (Diwali) नवीन वस्तू खरेदी करता यावी म्हणून वर्षभर थांबतात. यामागे अनेक कारणं आहेत. दिवाळी किंवा धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी नवीन कामाची सुरूवात करणं किंवा नवीन वस्तू खरेदी करणं शुभ असतं, असं मानलं जातं. याशिवाय दिवाळी सणानिमित्त अनेक कंपन्या आपली नवीन उत्पादनं लाँच (Product Launch) करतात. दिवाळीच्या काळात ग्राहकांना आकर्षक सवलतींसह विविध ऑफर्स (Diwali Offers) देखील मिळतात. परिणामी दिवाळीला मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. या खरेदी-विक्रीमध्ये वाहनांचा अगदी वरचा क्रमांक लागतो. दिवाळीच्या काळात अब्जावधी रुपयांची वाहन खरेदी-विक्री होते. तुम्ही देखील यावर्षी दिवाळीला (Diwali 2021) नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फेस्टिव्हल सिझन ऑफर्सचा (Festive Offers) नक्की फायदा घ्या.

  आज आम्ही तुम्हाला अशाच काही कार्सबद्दल माहिती देणार आहोत ज्या, यावर्षी लाँच झाल्या आहेत किंवा लवकरच लाँच होणार आहेत. सामान्य जनतेच्या खिश्याला परवडतील अशा काही बजेट कार्सची (Budget Cars) माहिती खाली दिली आहे...

  मारुती सुझुकी सेलेरियो न्यू जनरेशन (Maruti Suzuki Celerio)-

  भारतातील सर्वांत लोकप्रिय कार निर्माती कंपनी असलेली मारुती सुझुकी लवकरच सेलेरियोची एक नवीन आवृत्ती लाँच करणार आहे. सेलेरियोच्या (Celerio) नवीन मॉडेलची चाचणी घेण्यात आली असून त्याचे फोटोही समोर आले आहेत. सेलेरियोचं नवीन मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा अधिक मोठी आणि अधिक प्रशस्त आहे. यामध्ये अनेक नवीन फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे. नवीन सेलेरियोचं इंजिन जुन्या मॉडेलप्रमाणेच आहे. 1.0 लीटर पेट्रोल इंजिन क्षमता असलेलं हे इंजिन 67 बीपीएच पॉवर आणि 90 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. 5-सीटर हॅचबॅक प्रवासी क्षमता असलेल्या मारुती सुझुकी सेलेरियोची किंमत 4 लाख 66 हजार रुपयांपासून सुरू होते.

  मारुती वॅगन आर (Maruti Suzuki WagonR)-

  वॅगन आर (सर्व सामान्य लोक 'वॅगनार' या नावानं ओळखतात) ही कार मारुती सुझुकीची सर्वात पॉप्युलर हॅचबॅक कार आहे. या कारचे पेट्रोल इंजिन प्रति लीटर 21.79 किलोमीटर मायलेज देतं. कारचं CNG व्हर्जन सरासरी प्रति लीटर 32.52 किलोमीटर मायलेज देतं. गाडीची शोरूममधील किंमत 4 लाख 93 हजार रुपये आहे तर टॉप मॉडेलची किंमत 6 लाख 45 हजार रुपयांपर्यंत आहे.

  (हे वाचा:Flying Bike : जपानमध्ये मिळणार उडणारी बाईक; कंपनीकडून बुकिंगही सुरू)

  रेनॉ कायगर (Renault Kiger)-

  रेनॉची (Renault) निर्मिती असलेली ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही तुम्हाला प्रतिलिटर 20.53 किलोमीटर मायलेज देतं. या कारचं पेट्रोल इंजिन व्हर्जनदेखील उपलब्ध आहे. कारचं टर्बो इंजिन 100 पीए पॉवर आणि 160 एनएम टॉर्क जनरेट करतं. रेनॉ कायगरची किंमत 5 लाख 64 हजारांपासून सुरू होते. कारच्या टॉप मॉडेलची शोरूममधली किंमत 10 लाख 9 हजार रुपयांपर्यंत जाते. या कारमध्ये 5 लोक बसू शकतात.

  टाटा टिएगो (Tata Tiago)-

  टाटाची निर्मिती असलेल्या टिएगो कारची किंमत 5 लाख रुपये आहे. तर, टॉप मॉडेलची किंमत 7 लाख 5 हजार रुपयांपर्यंत जाते. टिएगोचं पेट्रोल इंजिन प्रति लिटर 23.84 किलोमीटर मायलेज देतं. टिएगोचं सीएनजी (CNG) मॉडेल लवकरच भारतात लाँच केलं जाऊ शकतं. त्यासाठी बुकिंगदेखील सुरू झालं आहे. जर तुम्हाला देखील दिवाळसणाच्या शुभ मुहूर्तावर कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर वरीलपैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता.

  First published:

  Tags: Car, Technology