
छोट्या पडद्याची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिच्या मालिकांमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहीली आहे. दिव्यांकाने २०१६ साली अभिनेता विवेक दहिया याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पण हे दिव्यांकाच अरेंज प्लस लव्ह मॅरेज होतं हे माहीत आहे का? शिवाय एका अभिनेत्यानेच त्यांच लग्नही जुळवलं होतं.

दिव्यांकाची मालिका ये है मोहबत्ते अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. याच मालिकेत दिव्यांका आणि विवेक यांची ओळख झाली होती.

एकाच मालिकेत काम करत असले तरीही त्यांचं एकमेकांशी बॉडींग नव्हतं. तर ते एकमेकांना फक्त कोस्टार म्हणूनच पाहत होते.

दरम्यान याआधी दिव्यांका जवळपास १० वर्षे अभिनेता शरद मल्होत्राला डेट करत होती. पण २०१५ साली त्यांचं ब्रेकअप झालं. आणि त्यानंतर दिव्यांका पूर्णपणे कोलमडून गेली होती.

विवेकने एका मुलाखतीत सांगीतलं होतं की सुरूवातीला ते एकमेकांना लाईक करत नव्हते. पण त्यांचे बंध कोणी तिसऱ्या व्यक्तिनेच जुळवले होते. व ती व्यक्ती त्याच्या सेट वरीलचं होती.

मालिकेतील इशिताचा ब्रदर इन लॉ पंकज भाटीया यांनी दिव्यांका आणि विवेकचे सुत जुळवले होते.

त्यानंतर ते वर्षभर एकमेकांना डेट करत होते. व २०१६ साली त्यांनी एन्गेज व्हायचं ठरवलं.

८ जुलै २०१६ ला दोघांनीही भोपाळमध्ये धुमडाक्यात लग्नगाठ बांधली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.