मुंबई 18 एप्रिल: सध्याच्या काळात अनेक अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी बिकिनी फोटोशूट करताना दिसतात. (Bikini Photoshoot) किंबहूना अनेक चाळीशी पार केलेल्या अभिनेत्री देखील स्वत:चं वजन कमी करुन बिकिनी शूट करुन घेतात. मात्र या ग्लॅमरच्या जगात वावरतानाही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) पारंपारिक पोषाखाला अधिक प्राधान्य देते. कपडे हे शरीर झाकण्यासाठी असतात त्यामुळं त्यांचा वापर तसाच केला जावा अशी विचारसरणी दिव्यांकानं मांडली आहे. ‘विरासत’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली दिव्यांका आज छोट्या पडद्यावरी सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आपल्या कारकिर्दीत तिनं अनेक उतार-चढाव पाहिले. परंतु कधीही चर्चेत येण्यासाठी तिनं बिकिनी फोटोशूट केलं नाही.
नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिव्यांकानं आपल्या करिअवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं बिकिनी फोटोशूट या विषयावर देखील आपलं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “बिकिनी किंवा स्विमसुट घालायला मला खूप लाज वाटते. ज्या स्रिया घालतात त्यांच्याबद्दल मला तक्रार नाही पण ती वस्त्र घालणं मला योग्य वाटत नाही. ज्या कुटुंबात मी लहानाची मोठी झाले तिथं कपडे हे फक्त शरीर झाकण्याचं साधन आहे असं पाहिलं जात होतं. अन् हा विचार खोलवर माझ्या मनात रुजला आहे. आता जर कोणी कितीही सांगितलं तरी देखील कदाचित तो विचार जाणं अशक्य वाटतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल बिकिनी घालायची नव्हती म्हणून मी बॉलिवूड चित्रपट देखील नाकारले आहेत. शिवाय आजवर स्विमिंग देखील शिकलेलं नाही. कारण तिथं स्विमसूट घालून जावं लागतं. माझं उघडं शरीर अज्ञात पुरुष पाहतायेत या विचारानंच मला घाम फुटतो. त्यामुळं बिकिनी परिधान करण्याच्या भानगडीत मी कधी पडले नाही.”
अवश्य पाहा - ही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम
दिव्यांकानं भोपाळमधील ऑल इंडिया रेडिओमधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती 2004 सालात आलेल्या ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या स्पर्धेत सहभागी झाली. यात अखेरच्या 8 स्पर्धकांमध्ये तिचा समावेश झाला. त्यानंतर दूरदर्शनवरील काही कार्यक्रमात तिने काम केलं. ‘बनू मैं तेरी दुलहन’ या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं. यानंतर तिनं अनेक मालिकांमधून मुख्य भूमिका साकारल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bold photoshoot, Entertainment