दिव्यांका त्रिपाठीचा एक्स बॉयफ्रेंड अडकणार लग्नाच्या बेडीत, 'अशी' आहे लग्नपत्रिका

दिव्यांकापासून वेगळं झाल्यावर शरद मल्होत्रा अभिनेत्री पूजा बिष्टला डेट करत होता.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 06:50 PM IST

दिव्यांका त्रिपाठीचा एक्स बॉयफ्रेंड अडकणार लग्नाच्या बेडीत, 'अशी' आहे लग्नपत्रिका

मुंबई, 12 एप्रिल : 'स्टार प्लस'वरील लोकप्रिय मालिका 'ये हैं मोहब्बतें'मधून घराघरात पोचलेली टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा एक्स बॉयफ्रेंड शरद मल्होत्रा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दिव्यांकाच्या लग्नाला जवळपास 3 वर्ष उलटल्यावर आता शरदही लग्न करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसातच म्हणजे 20 एप्रिलला रिप्की भाटियासोबत शरद लग्नगाठ बांधणार आहे.
 

View this post on Instagram
 

Holi hai nahi ....thiiiiiiiiii #gulabo #holimoly @ripci.bhatia


A post shared by Sharad_Malhotra009 (@sharadmalhotra009) on

2006 मध्ये झी टीव्हीवरील प्रसारित होत असेलेली मालिका 'बनूं मैं तेरी दुल्हन'मधून टीव्ही विश्वात पदार्पण करणारी दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड अखेर आपापल्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यावर शरद आणि दिव्यांका 2013मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. ब्रेकअपनंतर दिव्यांका आणि शरद अनेकदा एकमेकांबद्दल मोकळेपणानं बोलले. मात्र यातली खास गोष्ट अशी की या दोघांनी कधीच एकामेकांबद्दल कोणतीच वाईट गोष्ट बोलली नाही.
 

View this post on Instagram
 

They say ur lucky .......I say, I'm lucky ❤@ripci.bhatia #ripsha #ganpatibappamorya #nowandforever


A post shared by Sharad_Malhotra009 (@sharadmalhotra009) on

दिव्यांका पासून वेगळं झाल्यावर शरद मल्होत्रा अभिनेत्री पूजा बिष्टला डेट करत होता. तर 2016मध्ये दिव्यांकानं 'ये हैं मोहब्बतें'मधील सहकलाकार विवेक दहियासोबत लग्न केलं. लव्ह-अफेअर्सनंतर आता शरदनं खासगी आयुष्यात स्थिर होण्याचा निर्णय घेतला आहे. शरद आणि रिप्कीची लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पेस्टल ग्रीन रंगाची ही लग्नपत्रिका खूपच आकर्षक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या लग्नपत्रिकेवर लग्नाची तारीख आणि लग्नाचं स्थळही देण्यात आलं आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close