लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिव्या खोसलाची OOPS MOMENT, व्हिडीओ VIRAL

लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिव्या खोसलाची OOPS MOMENT, व्हिडीओ VIRAL

अभिनेत्री दिव्‍या कुमार खोसला (Divya Khosla Kumar) लॅक्मे फॅशन वीकमध्ये रँपवर उतरली होती. तिने रँपवर फ्रॉसील ग्रे रंगाचा लेहंगा घातला होता. मात्र रँपवर चालताना दिव्या एका संकटात सापडली.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : मुंबईमध्ये सध्या लॅक्‍मे फॅशन वीक (Lakme Fashion Week) सुरू आहे. विविध फॅशन डिझायनर आपलं फॅशन कलेक्शन लॅक्मे फॅशन वीकमध्ये उतरवण्यासाठी धडपडत असतात. यावेळी बॉलीवूडमधील अनेक कलाकार आपला जलवा या रॅम्पवॉकवर दाखवतात. अनेकदा हेच कलाकार Wardrobe Malfunction चे शिकारही होतात. दरम्यान अभिनेत्री आणि टी-सीरीज (T-Series) एमडी भूषण कुमार यांची पत्‍नी दिव्‍या खोसला कुमार(Divya Khosla Kumar) देखील रँपवर उतरली होती. आपल्या सुंदर अंदाजात दिव्या कुमार खोसला वावरत होती. तिने रँपवर फ्रॉसील ग्रे रंगाचा लेहंगा घातला होता. मात्र रँपवर चालताना दिव्या एका संकटात सापडली.

दिव्याने पूर्ण आत्मविश्वासाने रँम्पवर चालायला सुरुवात केली. मात्र चालतानाच ती एका संकटात सापडली. या संकटातूनही तिला तिच्या आत्मविश्वासाने वाचवलं. समयसूचकतेमुळे दिव्याने रँपवॉक न डगमगता पूर्ण केला. तर झालं असं दिव्या लॅक्मे फॅशन वीकच्या पाचव्या दिवशी रँपवॉकवर उतरली होती. यावेळी ती Krsna Couture शो टॉपर बनली होती. तिने परिधान केलेल्या फ्रॉसील ग्रे लेहंग्यासोबत डीप फ्रंट नेकलाइनवाला ब्‍लॉउज घातला होता. त्यावर तिने घातलेला नेकपीस अधिकच खुलून दिसत होता. मात्र दिव्याने जसा तिचा रँपवॉक सुरू केला, तेवढ्यात तिच्या लेहंग्याचा हूक निसटला. मात्र दिव्याने काही सेकंदातच आपला लेहंगा सांभाळला आणि पूर्ण आत्मविश्वासाने रँपवॉक पूर्ण केला.

सोशल मीडियावर VIRAL BHAYANI ने दिव्याच्या रँपवॉकचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उपस्थिताची वाहवा तर दिव्याने मिळवलीच, पण सोशल मीडियावर देखील दिव्याचं कौतुक होत आहे.

First published: February 17, 2020, 11:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या