तारक मेहता फेम दिशा वकानीनं खरेदी केली लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल चकीत

तारक मेहता फेम दिशा वकानीनं खरेदी केली लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल चकीत

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दिशा वकानी सध्या या मालिकेत परत येणार की नाही यावर मागच्या काही दिवसांपासून उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 मे : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी सध्या या मालिकेत परत येणार की नाही यावर मागच्या काही दिवसांपासून उलट सुलट चर्चा सुरू आहेत. पण दिशा आता एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. दिशानं नुकतीच एक लक्झरी कार खरेदी केली असून या कारचा फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे दिशा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दिशानं आपल्या नव्या कारचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत, 'माझी ऑडी कार' असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. याठीकाणी दिशानं या कारच्या मॉडेलबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरीही या फोटोवरुन ती ऑडी क्यू 5 असल्याचं समजतं. या कारची किंमत तब्बल 66 लाख ते 96 लाख रुपये एवढी आहे.View this post on Instagram


#mycaraudi


A post shared by Disha Vakani & Dilip Joshi (@disha_vakani) on

दिशानं 2008मध्ये 'तारक मेहता...'साठी काम करायला सुरुवात केली. पण 2017मध्ये तिनं मॅटर्निटी लीव्ह घेतली. त्यानंतर ती 5 महिन्यांनंतर या मालिकेत कमबॅक करणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र नंतर मानधनाच्या मुद्द्यावरून दिशा आणि निर्मात्यामध्ये वाद झाले आणि दिशानं मालिकेत परत येणास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दिशा पुन्हा 18 मे पासून मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करेल असं म्हटलं जात होतं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 10:32 PM IST

ताज्या बातम्या