मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, CBI ने केले स्पष्ट, राणे पितापुत्र ठरले खोटारडे!

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, CBI ने केले स्पष्ट, राणे पितापुत्र ठरले खोटारडे!


दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 23 नोव्हेंबर : अभिनेता सुशांत सिंग राजपुत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. दिशा सालियनचा मृत्यू नशेत असताना 14 व्या मजल्यावरून तोल गेल्याने छतावरून पडून झाल्याचा सीबीआयने निष्कर्ष काढला आहे. याबद्दल अहवाल सादर केला आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणाचा तपास करून सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला आहे.

(सुशांतच्या आठवणीत शरद केळकर भावुक; म्हणाला...)

विशेष म्हणजे, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलाने दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा वारंवार आरोप केला होता. एवढंच नाहीतर तिच्यावर बलात्कार झाल्याचा दावाही केला होता. मात्र सीबीआयच्या या निष्कर्षानंतर राणे पितापुत्रांच्या या आरोपांना आता तरी पूर्णविराम मिळणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

दिशाच्या आई-वडिलांनी हात जोडून केली होती विनंती

दरम्यान, मध्यंतरी नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हाला जगू दिलं जात नाहीये. आम्हाला आता त्रास देऊ नका, आम्हाला जगू द्या. राजकीय नेते आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. ती सोडून गेली आहे. यांना आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे? असा सवालच दिशाच्या आई वडिलांनी राणेंना विचारला होता.

(Disha Salian: "राजकारणामुळे जगणं मुश्किल झालंय, बदनामी होत राहिली तर..." दिशाच्या आई-वडिलांचा इशारा)

'जे दावे केले जात आहेत तसं काहीही झालेलं नाहीये माझ्या मुलीला विनाकारण बदनाम केलं जात आहे. सर्व सत्य पोलिसांना माहिती आहे. बदनामी होत राहिली तर आम्ही जगणार नाही. आम्ही जीवाचं बरंवाईट केलं तर त्यासाठी नेते जबाबदार असतील. मी आता हात जोडून विनंती करते की, कुणालाही बदनाम करु नका असंही दिशाच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं.

काय आहे प्रकरण?

28 वर्षाच्या दिशा सालियानने 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आधीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. दिशाच्या मृत्युमुळे एकीकडे तिचे आई-वडील दुःखात असताना, दुसरीकडे या घटनेचा सुशांत सिंगलाही धक्का बसला होता. मात्र काही दिवसांनंतर त्याच्याही मृत्यूची बातमी आली. त्यानंतर या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली आणि नंतर यात ड्रग्जचा अँगलही समोर आला होता, त्यानंतर नारायण राणेंनी गंभीर आरोपही केले होते.

First published: