दिशा पाटनीचे एक्स बॉयफ्रेंडसोबत Photo Viral, या कारणानं झालं होतं ब्रेकअप

दिशा पाटनीचे एक्स बॉयफ्रेंडसोबत Photo Viral, या कारणानं झालं होतं ब्रेकअप

एकेकाळी दिशा पाटनी या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. सध्या या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : बॉलिवूडमध्ये बोल्डनेससोबतच आपला अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. तिच्या आणि टायगर अफेअरच्या चर्चा सुद्धा अनेकदा होताना दिसतात. पण आता मात्र दिशाचे एक्स बॉयफ्रेंडसोबत काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड सुद्धा टीव्हीवरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. एक वेळ अशी होती की हे दोघं एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. मात्र नंतर काही असं झालं की दोघांनीही आपापले मार्ग बदलले.

दिशा पाटनी एकेकाळी प्रसिद्ध टिव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सध्या पार्थ एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये अनुरागची भूमिका साकारत आहे. दिशा तिच्या मॉडेलिंगच्या काळात जवळपास 1 वर्ष पार्थला डेट करत होती. पण अचानक या दोघांचं ब्रेकअप झालं. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ दिशाला चिट करत होता आणि याबाबत दिशाला समजल्यावर तिनं पार्थ पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण या दोघांनीही याबाबत बोलणं टाळलं.

अक्षय-कार्तिकनंतर आता विकी कौशलनंही PM-Cares फंडमध्ये दान केली मोठी रक्कम

पार्थसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा बराच काळ दुःखी होती. पण नंतर तिनं स्वतःला सावरलं आणि बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवण्याकडे भर दिला. सध्या पुन्हा एकदा दिशा आणि पार्थचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यासोबत त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा.

पार्थसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा आणि टायगर भेटले. मागच्या काही वर्षांपासून टायगर आणि दिशा एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही कबुली दिली नसली तरीही दोघांचे कुटुंबीयही एकमेकांशी खूप जवळचे आहेत. रिलेशिपबाबत बोलणं टायगर आणि दिशा नेहमी टाळत असले तरीही त्याचे सोशल मीडियावरील फोटो बरंच काही सांगून जातात.

कनिका कपूरबाबत नवी माहिती आली समोर, डॉक्टरांनी सांगितली सत्य परिस्थिती

काजोल आणि न्यासाला कोरोना झाल्याच्या चर्चा, अजय देवगणनं ट्विटरवरून सांगितलं सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2020 04:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading