मुंबई 7 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. त्यामुळं, तिचे चाहते नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओची वाट पाहात असतात. अशात आता दिशा पटानीच्या सिनेमाची प्रतिक्षा करणाऱ्या चाहत्यांना अभिनेत्रीनं एक सरप्राईज दिलं आहे. तिचं मेरे नसीब में (Mere Naseeb Mein) हे व्हिडिओ साँग रिलीज झालं असून याला भरपूर पसंती मिळताना दिसत आहे.
जबरदस्त आहे गाण्याचा व्हिडिओ -
यूट्यूबवर रिलीज झालेल्या मेरे नसीब में या गाण्याचा व्हिडिओ समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हे गाणं बॉलिवूडच्या सुपरहिट मेरे नसीब में या गाण्याचा रिमेक आहे. या गाण्यात दिशाच्या जबरदस्त डान्सची खास झलक पाहायला मिळत आहे.
मिळाले इतके लाईक -
दिशा पटानीनं मेरे नसीब में हे गाणं आपल्याच यूट्यूब चॅनलवर शेअर केलं आहे. या गाण्यात अभिनेत्री एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. शनिवारी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत 3 लाख 80 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.
या सिनेमांमध्ये झळकणार दिशा -
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, दिशा पटानी मागील वर्षी मलंग या सिनेमात झळकली होती. याशिवाय सलमान खानच्या भारत सिनेमातही दिशानं महत्त्वाची भूमिका साकारली असून प्रेक्षकांनी तिच्या भूमिकेची प्रशंसाही केली. आता पुन्हा एकदा दिशा सलमानसोबत झळकणार असून ती सध्या 'राधे: यूवर मोस्ट वॉन्टेड भाई' या सिनेमात व्यग्र आहे. या सिनेमात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय ती नागिन (Naagin)आणि रणबीर कपूरसोबत(Ranbir Kapoor) लव रंजन दिग्दर्शित आगामी चित्रपटातही झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Disha patani, Viral video.