दिशा पाटनी अनेक वर्षांपासून टायगरला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतेय, पण...

दिशा पाटनी अनेक वर्षांपासून टायगरला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतेय, पण...

ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखलं जातं.

  • Share this:

मुंबई, 26 मे : ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखलं जातं. हे दोघं अनेकदा एकमेकांच्या हातात हात घालून बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कार्यक्रमांना एकत्र दिसतात. पण अद्याप त्यांनी त्यांचं नातं सर्वांसमोर मान्य केलेलं नाही ते दोघंही नेहमीच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं सांगताना दिसतात. पण त्यांच्यातील खास बाँडिंग पाहिल्यावर त्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही आहे हे जाणवल्याशिवाय राहत नाही.

नुकत्याच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दिशाला, 'तुम्ही दोघंही तुमचं नातं स्वीकारत का नाही' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना दिशा म्हणाली, 'टायगरला इम्प्रेस करणं फार कठीण आहे. मागच्या अनेक वर्षांपासून मी त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. पण अद्याप त्यात मला यश आलेलं नाही. माझं नशीब मला साथ देत नाही आहे.' पण कदाचित 'भारत' सिनेमाच्या रिलीजनंतर सर्व गोष्टी बदलतील असा विश्वासही दिशाला वाटतो.
Loading...

 

View this post on Instagram
 

‍♀️‍♀️‍♀️ #MyCalvins @calvinklein


A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशानं पुढे सांगितलं, मी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. टायगरला इम्प्रेस करण्यासाठी मी खूप काही केलं पण तो इम्प्रेस झाला नाही. आता मी भारत सिनेमा केला, ज्यात मी अनेक स्टंट केले आहेत. मला वाटतं कदाचित त्यामुळे तो इम्प्रेस होईल पण माझं नशीब मला साथ देत नाही. आम्ही दोघं एकत्र फिरतो, लंच डिनर करतो पण याचा अर्थ असा नाही की या सर्व गोष्टींनी तो इम्प्रेस होतो. निदान जसा तुमचा क्रश इम्प्रेस होतो तसा तरी नाहीच तुम्ही पुढच्या वेळी त्याला भेटून हे प्रश्न विचारा. कदाचित आम्ही दोघंही लाजाळू स्वभावाचे असल्यानं कोणीच तसा प्रयत्न करत नाही आहे.

सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे सतत चर्चेत असणारी दिशा लवकरच सलमान खानच्या भारत या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. सध्या दिशा भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.


मराठी बिग बॉस 2 च्या घरात कुणाची वर्णी? महेश मांजरेकरांनी सांगितलं गुपित


स्वतःपेक्षा 14 वर्षांनी लहान प्रेग्नंट गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालनं ठेवली बेबी शॉवर पार्टी, पाहा फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...