मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दिशा पाटनीनं केली टायगरची कॉपी, सोशल मीडियावर बॅक फ्लिपचा VIDEO VIRAL

दिशा पाटनीनं केली टायगरची कॉपी, सोशल मीडियावर बॅक फ्लिपचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिशा पाटनीनं टायगरला हुबेहूब कॉपी केलेलं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिशा पाटनीनं टायगरला हुबेहूब कॉपी केलेलं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिशा पाटनीनं टायगरला हुबेहूब कॉपी केलेलं पाहायला मिळत आहे.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 16 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांच्या अफेअरच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. या दोघांनीही याबाबत कोणताही खुलासा केला नसला तरीही अनेकदा हे दोघं एकमेकांसोबत टाइम स्पेंड करताना दिसतात. एवढंच नाही तर दिशा पाटनी टायगरच्या फॅमिलीच्या खूप जवळची आहे. टायगर बहीण कृष्णा श्रॉफ तिची खूप चांगली मैत्रीण आहे. टायगर आणि दिशा कपल गोल्स सोबतच त्यांच्या चाहत्यांना फिटनेस गोल्स सुद्धा देत असतात. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच ते त्यांचे वर्कआउट व्हिडीओ शेअर करतात. दिशा पाटनीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिशा पाटनीनं टायगरला हुबेहूब कॉपी केलेलं पाहायला मिळत आहे. तिनं नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात ती बॅक फ्लिप मारताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या बॅक फ्लिपची तुलना टायगर श्रॉफशी केली जात आहे. Bigg Boss 13 सिद्धार्थ शुक्लाच्या नावावर, मिळवलं एवढ्या लाखांचं रोख बक्षीस
View this post on Instagram

Back to the grind💪🏽

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा पाटनीचा हा व्हिडीओ आतापर्यंत 13 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. याशिवाय अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. टायगर आणि दिशा नेहमीच असे फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. या दोघांना बॉलिवूडचे सर्वात फिट सेलिब्रेटी म्हणून ओळखलं जातं. दिशानं काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाप्रकारचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. Lakme Fashion Week 2020 जान्हवी की सनी लिओनी कुणाचा कॅटवॉक बेस्ट?
View this post on Instagram

mornings be like, 60 kg ( 125 pounds) a** to grass, 4 reps🌸🌸 @rajendradhole ❤️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर 'मलंग' हा तिचा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात तिनं पहिल्यांदाच आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय दिशा लवकरच सलमान खानसोबत 'राधे' सिनेमात दिसणार आहे. तर टायगर लवकरच श्रद्धा कपूर सोबत 'बागी 3' मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. VIDEO : ‘प्रेम म्हणजे थप्पड मारण्याचं लायसन्स नाही’, तापसीचा व्हिडिओ व्हायरल
First published:

Tags: Bollywood, Disha patani

पुढील बातम्या