दिशा पाटनी आणि आदित्य ठाकरेंची डिनर डेट? दोघांचे फोटो सोशल मीडियावर VIRAL
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे अभिनेत्री दिशा पाटनी हिच्याबरोबर दिसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर ती 'टायगर' या शब्दावरून ट्रोल झाली. सलमान खानच्या नुकत्याच रीलिज झालेल्या BHARAT चित्रपटात दिशा झळकली होती.
मुंबई, 10 जून : दिशा पाटनी ही अभिनेत्री हल्ली वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या ड्रेसमुळे, इन्स्टाग्राम पोस्टमुळे तर कधी तिने टाकलेल्या फोटोंमुळे. भारत सिनेमाची ही अभिनेत्री टायगर श्रॉफला डेट करते अशा अर्थाच्या बातम्या काही गॉसिप मॅगझीन्सनी दिलेल्या होत्या. पण आता मात्र सोशल मीडियात वेगळीच चर्चा सुरू आहे, तेही शिवसेनेशी संबंधित. आता चर्चेत आहे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यामुळे. आदित्य ठाकरेंबरोबर ती डिनर डेटला गेलेली दिसली. त्या दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ट्विटरवर वेगवेगळ्या शंकांना, कमेंट्सना ऊत आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बरोबर ही अभिनेत्री एका उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये दिसली. त्यांचा फोटो सोशल मीडियावर आणि तिच्या फॅन पेजवर शेअर झाला आणि सोशल चर्चा सुरू झाल्या. जॅकी श्रॉफचा मुलगा आणि दिशाबरोबर पहिल्या सिनेमात दिसलेला तिचा को-स्टार टायगर श्रॉफबरोबर दिशा पाटनीचं नाव जोडलं जातं. त्या दोघांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल काहीच जाहीर केलेलं नाही, पण आता आदित्य ठाकरेंबरोबर दिशा दिसल्यामुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
दिशा पाटनी हिचा सलमान खानबरोबरचा भारत सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात तिने राधा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्याबरोबर दिशाचा फोटो झळकल्यावर नेटिझन्सनी भराभर कमेंट्स करायला सुरुवात केली.
सलमान खानच्या या हिरोईनचं टायगर श्रॉफबरोबर नाव जोडलं जातं, हे माहीत असलेल्यांनी 'टायगर जिंदा है आणि 'एक था टायगर', टायगर जिंदा है, अशी नावं घेत तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने तर 'खरा टायगर तर ठाकरेच आहे', अशीही कमेंट एका वाचकाने केली. दिशा पाटनी पहिल्यांदाच कुठल्या राजकारणी व्यक्तीबरोबर दिसली आहे असं नाही. उच्चभ्रू पार्ट्यांना ही अभिनेत्री नेहमीच जात असते. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने तिचे फोटोही लगेच सोशल मीडियावर झळकतात आणि व्हायरल होतात.
यापूर्वीही ती राजकारण्यांबरोबर झळकली आहे, असं बोललं जातं.