‘मी स्वतःसाठी कपडे घालते, इतरांसाठी नाही’ ट्रोलर्सना दिशा पाटनीचं सडेतोड उत्तर

‘मी स्वतःसाठी कपडे घालते, इतरांसाठी नाही’ ट्रोलर्सना दिशा पाटनीचं सडेतोड उत्तर

अवॉर्ड फंक्शन असो किंवा मग पार्टी दिशा नेहमीच बोल्ड आणि ब्युटीफुल अवतारात दिसते. पण यामुळे तिला अनेकदा ट्रोल सुद्धा व्हावं लागतं.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पण याशिवाय ती आणखी रक्त गोष्टीमुळे चर्चेत राहते ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. अवॉर्ड फंक्शन असो किंवा मग पार्टी दिशा नेहमीच बोल्ड आणि ब्युटीफुल अवतारात दिसते. पण यामुळे तिला अनेकदा ट्रोल सुद्धा व्हावं लागतं. यावर थेट प्रतिक्रिया देणं ती केव्हाही टाळतेच. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मात्र दिशानं तिच्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

'मलंग' सिनेमाची सक्सेस पार्टी नुकतीच मुंबईमध्ये पार पडली. यावेळी सुद्धा दिशाच्या लुकने सर्व घायाळ झाले. न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंगविषयी दिशा म्हणाली, 'जेव्हा सुरुवातीला मला ट्रोल केलं जातं असे तेव्हा मला खूप वाईट वाटत असे. पण आता असं होत नाही. आता मी या सगळ्यातून सावरले आहे. लोक मला काय बोलतात, माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मी अजिबात विचार करत नाही. मला त्यांच्या बोलण्याचं वाईट अजिबात वाटत नाही कारण मी इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी कपडे घालते. मग मी त्यांच्या बोलण्याचं वाईट का वाटून घेऊ.'

बॉलिवूड सिनेमांबद्दलच्या अशा खास गोष्टी, ज्या आजही तुम्हाला माहित नसतील

 

View this post on Instagram

 

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा पाटनी लवकरच सलमान खानच्या 'राधे' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, 'मी सलमान सोबत शाहरुख खानची सुद्धा खूप मोठी चाहती आहे. मला त्याच्यासोबत एक तरी सिनेमात काम करायची इच्छा आहे. त्याच्यासोबत मला एखादा लहानसा रोल मिळाला तरी खूप आहे.'

त्याला रंगेहाथ पकडलं अन् माफही केलं,'त्या' रिलेशनशीपबाबत पहिल्यांदा बोलली दीपिका

दिशा पुढे सांगते, 'एखाद्या सिनेमात माझी भूमिका मोठी आहे की लहान याचा मी कधीच विचार करत नाही. भूमिका लहान असेल आणि अभिनेता मोठा स्टार असेल तर मी आशा सिनेमाला होकार देते. मागच्या वर्षी मी भारत सिनेमा केला ज्यात माझा रोल खूप मोठा नव्हता. मात्र मला त्या निमित्तानं सलमानसोबत काम करायला मिळालं. शाहरुख खानची मी खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे त्याच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी लहानशी भूमिकाही करायला तयार आहे.

TRP मध्ये ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेचा दबदबा कायम, ‘नवऱ्याच्या बायको’ला फटका

First published: March 14, 2020, 8:28 AM IST

ताज्या बातम्या