टायगर, श्रद्धा आणि दिशामध्ये लव्ह ट्रँगल? दिशानेच केलेल्या खुलाशाच्या व्हिडीओ VIRAL

टायगर, श्रद्धा आणि दिशामध्ये लव्ह ट्रँगल? दिशानेच केलेल्या खुलाशाच्या व्हिडीओ VIRAL

अभिनेत्री दिशा पाटनी, श्रद्धा कपूर आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिशा यावेळी या तिघांमधील लव्ह ट्रँगलबाबत काहीतरी कुजबुजताना दिसली.

  • Share this:

मुंबई, 2 मार्च : अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांचं अफेअर असल्याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मात्र दोघांनीही त्याबाबत पक्कं असं काहीच सांगितलेलं नाही. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही आहे. मात्र दोघे नेहमी एकत्र दिसत असल्यामुळे, त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू असते. अनेकदा दोघं डेटसाठी गेलेलं पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच ही जोडी मागच्या काही काळापासून कायम चर्चेत दिसते. त्यानंतर टायगर आणि दिशाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या. पुन्हा काही काळानंतर दोघे एकत्र दिसू लागले.

आता दिशा आणि टायगरचा एक व्हिडीओ समोर येत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सुद्धा आहे. हे कलाकार मुंबई विमानतळावर फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यावेळी फोटोग्राफर्सना पाहून दिशा टायगरच्या कानात काहीतरी कुजबुजली.

(हे वाचा-'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लाँचमध्ये कतरिनाचा हॉट अंदाज, फोटो सोशल मीडियावर VIRAL)

फोटोग्राफर्सना पाहून दिशाने अशी कमेंट केली आहे की, 'आता हे लोकं म्हणतील हा लव्ह ट्रँगल (love triangle) आहे.' दिशाच्या या कमेंट नंतर टायगर आणि श्रद्धा दोघेही हसताना दिसले. टायगर, श्रद्धा आणि दिशा दुबईवरून परतताना मुंबई एअरपोर्टवर आले, त्यावेळी हा किस्सा घडला.

टायगरनं नुकतंच डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केलं. त्याचा एक फोटो त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये टायगरचे अ‍ॅब्स दिसत आहेत. टायगरच्या या फोटोवर कमेंटमध्ये दिशानं फायर इमोजी पोस्ट केला आहे. त्यामुळे दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरूवात झाली.

First published: March 2, 2020, 9:21 PM IST

ताज्या बातम्या