गुडघ्याच्या दुखापतीनंतरही स्टंट करणार ही अभिनेत्री, फ्रंट फ्लिपचा VIDEO व्हायरल

गुडघ्याच्या दुखापतीनंतरही स्टंट करणार ही अभिनेत्री, फ्रंट फ्लिपचा  VIDEO व्हायरल

दिशाने तिच्या एक्सरसाईज रेजिमचा नवा व्हिडिओ शेअर केलाय. त्यात जिम्नॅस्टिक्सच्या front flip हा अवघड प्रकार करताना ती दिसते आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : ही नव्या पिढीची अभिनेत्री तिच्या फिटनेससाठीच ओळखली जाते. पहिल्याच सिनेमात अॅक्शन हिरो टायगर श्रॉफबरोबर दिसलेल्या दिशा पाटनीबद्दल आम्ही बोलत आहोत. दिशाने Disha Patani तिच्या  एक्सरसाईज रेजिमचा नवा व्हिडिओ शेअर केलाय. त्यात जिम्नॅस्टिक्सच्या फ्रंट फ्लिप हा अवघड प्रकार करताना ती दिसते आहे. मध्यंतरी गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर दिशाने फ्रंट फ्लिप करण्याचा प्रयत्न सोडून दिला होता. आता मात्र दुखापतीतून बाहेर आल्यानंतर तिने पहिल्यांदा प्रयत्न केला आणि ती यशस्वीसुद्धा झाली. तिचा हा फ्रंट फ्लिपचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

Finally landed my first front flip! Didnt attempt a front tuck because of fear post my knee injury...happy i overcame my fear 😊🙏❤

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेससाठी खूप चर्चेत असते. ती अनेकदा फिटनेसचे व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. दिशानं मिक्स मार्शल आर्टचं ट्रेनिंग सुद्धा घेतलं आहे. त्याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या तिच्या भारत सिनेमातही ती स्टंट करताना दिसलली होती. मात्र या स्टंटच्या शूटिंगच्या वेळी तिच्या पायाला दुखापत झाली होती. सध्या दिशा यातून रिकव्हर होत आहे.

दिशा शूटिंगमध्ये नसते, तेव्हा मी जिमनॅस्टिक आणि मिक्स मार्शनल आर्टची प्रॅक्टिस करते. मिक्स मार्शल आर्ट खूप सोपं आहे. मात्र जिमनॅस्टिकसाठी रोजचा सराव असणं खूप महत्त्वाचं आहे, असं दिशानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

आणखी एका अभिनेत्रीने शेअर केला Nude Yoga चा पुरस्कार, शेअर केले Topless Photo

दिशा लवकरच मोहित सूरीचा आगामी सिनेमा ‘मलंग’मध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातील काही भागांचं शूटिंग मॉरिशसमध्ये झालं आहे. ज्यात दिशा अंडर वॉटर सीन करताना दिसणार आहे.

बॉलिवूडमधील 'ही' 10 लोकप्रिय गाणी, जी आहेत मूळ पाकिस्तानी गाण्यांची कॉपी!

‘मलंग’ हा सिनेमा 2020 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. याच दिवशी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा ‘लव्ह आज कल 2’ सुद्धा रिलीज होणार आहे त्यामुळे या दोन्ही सिनेमांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते. काही दिवसांपूर्वी दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू होत्या मात्र त्यानंतर अनेकदा ते दोघंही एकत्र दिसल्यानं या चर्चा फक्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं.

------------------------------------------------------

पावसाळी सहलीचा प्लान करताय, 'या' धबधब्यावर नक्की जा!

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 2, 2019, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading