क्षणभरही विचार न करता दिशा पटानी सलमानला म्हणाली, हो....

क्षणभरही विचार न करता दिशा पटानी सलमानला म्हणाली, हो....

अभिनेत्री दिशा पटानीने सलमान खान (Salman Khan)ला होकार दिला आहे. तसंच सलमान खान खूप गोड आहे असंही ती म्हणाली.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर: बी टाऊनमध्ये सध्या सल्लूमियाँ आणि दिशा पटानी (Disha patani)चीच चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. दिशा पटानीने सलमान खान (Salman khan) ला होकार दिला आहे. एवढ्यावरच न थांबता तिने सलमान खूपच गोड आहे असंही म्हटलं आहे. दिशा सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी जॅकी श्रॉफची गर्लफ्रेंड म्हणून पण आता ती चर्चेत आली आहे. सलमानसोबतच्या नव्या प्रोजेक्टमुळे. सलमान खानच्या राधे (Radhe) या सिनेमामध्ये दिशा त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

सलमानने दिशाला सिनेमामध्ये काम करण्याबाबत विचारलं तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता तिनं सलमानला होकार देऊन टाकला. ‘’सलमान खानसोबत काम करणं हा अतिशय उत्तम अनुभव असतो. त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं’’, असं म्हणत तिने त्याला होकार दिला आहे. सलमानसोबतच राधे सिनेमामध्ये प्रभूदेवाही झळकणार आहे. सलमानबरोबरच प्रभूदेवा या सिनेमाचा भाग असणार आहे हे ऐकून तर मला फारच आनंद झाला’’ अशी भावना दिशाने व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

Back to shoot after 6 1/2 months ... feels good #Radhe

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

हे वाचा-"सुशांतची हत्या झाली होती"; AIIMS च्या डॉक्टरांची AUDIO CLIP लीक

राधे  सिनेमच्या शूटिंगला तब्बल साडेसहा महिन्यांनी सुरुवात झाली आहे. त्यामुळे सेटवरील सर्वच मंडळी सध्या खूप खूश आहेत. सध्या सलमान आणि दिशाच्या एका रोमँटिक गाण्याचं शूट सुरू आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमानसह अनेक मोठे कलाकार वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पण आता सल्लूची गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर आली असून त्याच्या शूटिंगला दणक्यात सुरुवात झाली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 5, 2020, 2:32 PM IST

ताज्या बातम्या