मुंबई, 29 डिसेंबर : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटानी आपल्या हॉट स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. चाहत्यांना तिचा ग्लॅमरस लूक खूप आवडतो. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल 41 मिलीयन पेक्षा अधिक फोल्लोवर्स आहेत. यावरुन तिची दर्शकांमध्ये असलेली क्रेझ लक्षात येते. दिशाने आज तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोत ती पिवळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे.
दिशा सर्फिंग करतानाचा हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये सर्फिंग बोर्डवर पाण्याच्या मध्यभागी उभी असल्याची दिसत आहे. तिच्या हातात एक काठी आहे. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "अॅक्वामॅनप्रमाणे वाटत आहे!" या फोटोत तिने तिची पोजही सुपरहिरो एक्वामॅनसारखी दिली आहे. एक्वामॅन (Aquaman) हा हॉलिवूडचा सुप्रसिद्ध चित्रपट असून हे काल्पनिक सुपरहीरोचं पात्र आहे. एक्वामॅनचं हे पात्र अमेरिकन अभिनेता जेसन मोमोआ (Jason Momoa) यांनी साकारलं होतं.
दिशा पाटानी सध्या मालदीवमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. तिचा हा हॉट अंदाजातला हा फोटो पाहून चाहते तिला 'एक्वागर्ल' म्हणत आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आणखी एक फोटो पोस्ट केला होता.

तिच्या आगामी 'राधे' चित्रपटात दिशा सलमान खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग त्यांनी ऑक्टोबरमध्येच पूर्ण केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभुदेवानं केलं आहे. रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफसुद्धा राधेमध्ये दिसणार आहेत. याशिवाय दिशा पाटनी एकता कपूरच्या केटीनामध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर मोहित सूरीच्या 'एक व्हिलन' च्या दुसर्या भागातही ती दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.