फिटनेससाठी दिशा पाटनी जीममध्ये गाळतेय घाम, पाहा व्हिडिओ

फिटनेससाठी दिशा पाटनी जीममध्ये गाळतेय घाम, पाहा व्हिडिओ

दिशा पाटनीच्या ट्रेनरनं त्याच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हे फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 2 जून : अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या रिलेशनशीपमुळे वारवांर चर्चेत येणारी अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेससाठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. ती नेहमीच तिचे वेगवेगळे व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. सोशल मीडिया सक्रिय असणाऱ्या दिशाच्या ट्रेनरनं नुकताच एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे दिशाचं कौतुक होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेते हे दिसून येत. तसं पाहायला गेलं तर ती तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते मात्र हा व्हिडिओ खूप वेगळा आहे. या व्हिडिओमधून दिशा तिच्या फॅन्सना फिटनेस गोल्स देत आहे.

खिलाडी अक्षय कुमारला मुंबईच्या पावसाचा असा बसला फटका

दिशा पाटनीच्या ट्रेनरनं त्याच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हे फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचे हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच जीममध्ये जाऊन वर्कआउट करण्यासाठी प्रेरित करतील. या व्हिडिओमध्ये दिशा खूप मेहनत करताना दिसत आहे. यात ती कमरेचे एक्सरसाइझ करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा हातात केस घेऊन  एडवान्स क्वाट्स करताना दिसत आहे. तर सपोर्टसाठी तिच्या ट्रेनरनं तिला पकडलेलं दिसत आहे.

मुंबईच्या पावसात अडकली अभिनेत्री, या हिरोने वाचवले प्राण

 

View this post on Instagram

 

•One part of gluteus workout• @dishapatani 💪🏽 • • • #workout #gym #gluteus

A post shared by Aleksandar Alex Ilic (@iamaleksandarilic) on

सध्या दिशा तिचा आगामी सिनेमा मलंगच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या एक स्टंट सीन करताना दिशाला दुखापतही झाली होती. या सिनेमात दिशासोबत आदित्य रॉय कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. याशिवाय या सिनेमात अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाच दिग्दर्शन मोहित सूरी करत आहे.

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं घडवून आणली होती सारा-कार्तिकची पहिली भेट

=================================================

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

First published: July 2, 2019, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading