दिशा पटनीचा 'हॉट' PHOTO व्हायरल, टायगरच्या बहिणीने दिली 'ही' प्रतिक्रीया

दिशा पटनीचा 'हॉट' PHOTO व्हायरल, टायगरच्या बहिणीने दिली 'ही' प्रतिक्रीया

बॉलीवूडची बिनधास्त गर्ल दिशा पटनी (Disha Patani) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. खासकरून Instagramवर ती कायम आपले बिनधास्त फोटो ती शेअर करते.

  • Share this:

मुंबई 15 नोव्हेंबर : बॉलीवूडची बिनधास्त गर्ल दिशा पटनी (Disha Patani)  सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. खासकरून Instagramवर ती कायम आपले बिनधास्त फोटो ती शेअर करते. दिलायला सुंदर आणि कमनीय बांधा असल्याने तिच्या फोटोंना कायम तुफान प्रतिसाद मिळतो आणि ते ती एन्जॉयही करत असते. अशा फोटोंमधून ती अनेकदा जाहीरातही करत असते. दिशाने नुकताच एक फोटो Instagramवर टाकलाय. गुलाबी खास ड्रेसमधला हा फोटो व्हायरल झाला असून त्याला 15 लाखांपेक्षा जास्त जणांनी Like केलंय.

View this post on Instagram

#MyCalvins #CK50 @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

या फोटोत दिशा स्माइल करताना दिसत असून ती अतिशय सुंदर दिसतेय. तिचा हा फोटो पाहून टायगर श्रॉफची बहिण कृष्णानेही तिचं कौतुक केलंय. या फोटोत तु खूप सुंदर दिसतेस अशी कमेंट कृष्णाने केलीय तर त्याला दिशाने Thank You म्हणून उत्तरही दिलंय.

दिशाने नुकतचं आपलं यूट्यूब चॅनलही लाँच केलंय. त्यावरही ती आपले व्हिडीओ सातत्याने टाकत असते. टायगर आणि दिशाच्या अफेअर्सची चर्चा बॉलिवूडमध्ये कायम होत असते. अनेक कार्यक्रमांमध्येही ते दोघं हातात हात घालून दिसले आहेत. तर अनेकदा रेस्टॉरेंट्समध्येही त्या दोघांना पाहण्यात आलंय. टायगर श्रॉफसोबत बागी-2 चित्रपटानंतर दिशाने सलमानच्या भारत सिनेमात काम केलं. त्यात दिशाने सलमानच्या बहिणीची भूमिका केली होती.  सलमानसोबत काम केल्यानंतर दिशाला आणखी सिनेमांची ऑफर आल्या होत्या.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 15, 2019, 11:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading