Home /News /entertainment /

आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर दिशा पाटनीनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर दिशा पाटनीनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

न्यूज 18 ला दिलेल्या मुलखातीत दिशा पाटनीनं पहिल्यांदाचा महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 05 फेब्रुवारी : अभिनेत्री दिशा पाटनी मागच्या काही काळापासून तिचा आगमी सिनेमा ‘मलंग’मुळे चर्चेत आहे. येत्या 7 फेब्रुवारीला रिलीज होणारा हा सिनेमा मर्डर मिस्ट्री आहे. रिलीजच्या आधीच हा सिनेमा दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांची सिझलिंग केमिस्ट्री आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत आहे. सध्या या संपूर्ण मलंगची टीम जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान न्यूज 18 ला दिलेल्या मुलखातीत दिशा पाटनीनं पहिल्यांदाचा महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच दिशा पाटनी आणि आदित्य ठाकरे यांचे डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोघांबद्दल अनेक चर्चा झाल्या. एवढंच नाही तर या दोघांच्या अफेअर्सचेही अंदाज लावले गेले. त्यावेळी दिशानं 'एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांचे चांगले मित्र असू शकत नाही का? माझ्या मैत्रिणी कमी आणि मित्र जास्त आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच आम्ही दोघं डिनरला गेलो तर यात चुकीचं काय आहे' असंही तिनं म्हटलं होतं. अर्जुनच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे मलायका, पाहा रोमँटिक VIDEO
View this post on Instagram

🌸#malang

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिशा पाटनीला आदित्य ठाकरेंबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. त्याची तिनं बिनधस्त उत्तरं दिली. सध्या आदित्य महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे तुझ्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि किती विश्वास आहे असा प्रश्न दिशाला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्यावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्त्वाची गरज आहे आणि ही खूपच चांगली गोष्ट आदित्य सारखा यंग लीडर महाराष्ट्राला मिळाला आहे.' दिशाचं 'हे' प्रेम तुम्हाला माहित आहे का? भारताच्या युवा खेळाडूबद्दल म्हणते...
View this post on Instagram

#Malang ♥♥ @anilskapoor @adityaroykapur @khemster2 @mohitsuri

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा पुढे म्हणाली, 'आदित्य पर्यावरण संवर्धनासाठी बरंच काही करत आहे. खास करुन जंगलं वाचवण्यासाठी त्यानं चांगले निर्णय घेतले आहेत. मला आदित्यवर पूर्ण विश्वास आहे आणि आता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. त्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला चालना दिली आहे. तुम्ही रात्री उशीरा बाहेर जाऊ शकता फिरु शकता, सिनेमा पाहू शकता. या संकल्पनेवर त्यांनं बरीच मेहनत घेतली आहे' असं म्हणत दिशानं आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं. अभिषेक बच्चन घरात कोणाला घाबरतो? आई जया बच्चन यांना की बायको ऐश्वर्याला...
Published by:Megha Jethe
First published:

Tags: Bollywood, Disha patani

पुढील बातम्या