दिशा पटानीचं पहिलं ऑडिशन पाहिलं का? 10 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

दिशाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Disha Patani first audition video) हा व्हिडीओ तिच्या पहिल्या ऑडिशनचा आहे. हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.

दिशाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Disha Patani first audition video) हा व्हिडीओ तिच्या पहिल्या ऑडिशनचा आहे. हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.

  • Share this:
    मुंबई 13 जून: दिशा पटानी (Disha Patani) ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एका चॉकलेटच्या जाहिरातीतून करिअर सुरु करणाऱ्या दिशानं आज आपल्या अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. आज तिचा वाढदिवस आहे. (Happy birthday Disha Patani) 29 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान दिशाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Disha Patani first audition video) हा व्हिडीओ तिच्या पहिल्या ऑडिशनचा आहे. हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. हा व्हिडीओ 10 वर्ष जुना आहे. त्यावेळी ती 19 वर्षांची होती. या व्हिडीओमध्ये ती स्वत:चं इन्ट्रोडक्शन देताना दिसत आहे. हे ऑडिशन तिनं एक फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी दिलं होतं. या जाहिरातीमधील काही डायलॉग्स ती या व्हिडीओमध्ये उच्चारताना दिसत आहे. खरं तर हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी दिशानंच आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केला होता. मात्र आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुलाखत देताना अभिनेते दाढी का खाजवतात? सुनील ग्रोवरनं सांगितलं थक्क करणारं कारण ‘काळ्या चेहऱ्यामुळं मिळत नव्हतं काम’; फॅमेली मॅनच्या पत्नीनं केलाय वर्णद्वेषाचा सामना दिशाला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. परंतु तिच्या कुटुंबीयांना ही आवड फारशी आवड नव्हती. त्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आली होती. मुंबईत आली तेव्हा तिच्याकडे केवळ 500 रुपये होते. या 500 रुपयांत तिला स्वत:चा खर्च भागवायचा होता. कुटुंबीयांची नाराजी पत्करुन आल्यामुळं त्यांच्याकडून तिला कुठलीच आर्थिक मदत मिळत नव्हती. सुरुवातीस तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. एक लहानशी भूमिका मिळवण्यासाठी देखील तिला जागोजागी पायी फिरुन ऑडिशन्स द्यावी लागत होती. दिशानं काही काळ मॉडलिंग देखील केलं होतं. ती सुंदर होती. त्यामुळं तिला एका चॉकलेटच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. या जाहिरातीमुळं तिचं नशीब एकाएकी बदललं. या जाहिरातीमुळं तिला लोफर या तेलुगु चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. अन् या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. लोफर हा चित्रपट फारसा चालला नाही. पण यामुळं दिशासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. तिला ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या बिग बजेट बॉलिवूडपटात काम करण्याची संधी मिळाली. अन् त्यानंतर ती बागी, मलंग, राधे यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटात झळकली. आज ती बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
    Published by:Mandar Gurav
    First published: