बॅक फ्लिप स्टंट करताना पडली दिशा पटानी, VIDEO VIRAL

बॅक फ्लिप स्टंट करताना पडली दिशा पटानी, VIDEO VIRAL

दिशाचा एक स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच तिच्या फिटनेससाठी चर्चेत असते. दिशानं भारत सिनेमामध्ये स्टंट केले होते आणि त्यासाठी तिनं खूप तयारीही केली होती. याशिवाय ती अनेकदा तिचे फिटनेस आणि स्टंट व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. सध्या दिशाचा एक स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत. दिशाच्या या व्हिडीओवर तिचे चाहते सतत कमेंट करत आहेत.

दिशा पाटनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ती बॅक फ्लिप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना दिशानं लिहिलं, सोमवारची सकाळ काहीशी अशी होती. या खाली पडण्याकडे दुर्लक्ष करा कारण, मी सध्या शिकत आहे. या व्हिडीओमध्ये दिशा पाटनी बॅक फ्लिपची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या दरम्यान ती खाली पडली आणि आपटली. दिशा या आधीही भारत सिनेमाच्या शूटिंग दरम्यान स्टंट करताना पडून जखमी झाली होती.

 

Loading...

View this post on Instagram

 

Monday morning be like and Ofcourse ignore the epic fall still learning

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा सध्या तिचा आगामी सिनेमा ‘मलंग’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. एकत्र स्क्रिन शेअर करण्याची आदित्य आणि दिशा यांची ही पहिलीच वेळ असून या सिनेमातही तिचे स्टंट सीन असणार आहेत. काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तिला पुन्हा एकदा दुखापत झाली होती आणि यानंतर दिशा इंजेक्शन व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

दिशा पाटनी याआधी सलमान खान सोबत भारत सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिनं सलमाच्या माजी प्रेयसीची भूमिका साकारली होती. तिच्या या अभिनयाचं खूप कौतुक सुद्धा झालं. त्यानंतर आता लवकरच तिचा मलंग हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात दिशा पाटनी आणि अदित्य रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याव्यतिरिक्त अनिल कपूर आणि कुणाल खेमू सुद्धा या सिनमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

==============================================================

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 11:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...